
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा- संभाजी गोसावी.
राज्यांत शिंदे सरकार स्थापनेनंतर पोलीस दलांतील उच्च पदावरील बदल्या होणे अपेक्षित होतेच पण काही कारणांने त्या होण्यांस बराच अवधी लागला. मागील महिन्यांत पोलीस अधीक्षक पदाच्या बदल्या जाहीर झाल्या. यामध्ये साताऱ्यांचे माजी पोलीस उपअधीक्षक समीर शेख यांची गडचिरोली येथून प्रमोशन वर साताऱ्यात बदली झाली. मात्र अजयकुमार बंसल यांना मात्र बदलीचे ठिकाण मिळाले नाही व त्यांना प्रतीक्षेत ठेवण्यांत आले आज पुन्हा उर्वरित प्रतिक्षा यादीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यांत आल्या. यामध्ये सातारा अप्पर पोलीस अधीक्षक पदी सोलापूर शहर विशेष गुन्हे शाखेचे अधिकारी श्री. बापू विठ्ठल बांगर यांची नियुक्ती करण्यांत आली. मात्र पुन्हा बंसल यांच्याप्रमाणेच अजित बोहाडे यांनाही प्रतिक्षित ठेवण्यांत आले. या बदल्यांमध्ये सातारा विभागांच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती. आँचल दलाल मॅडम यांची सांगली अप्पर पोलीस अधीक्षक या पदावर नियुक्ती करण्यांत आली. साताऱ्यांचे नूतन अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर साहेब यांची पोलीस प्रशासनांमध्ये कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून त्यांची चांगलीच ओळख आहे. त्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये कायदा-सुव्यवस्था अबधित राहण्यासाठी त्यांची विविध जिल्ह्यांमध्ये उत्कृंष्ट व पारदर्शक कामगिरी ठरली.