
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मुंबई- संभाजी गोसावी.
राज्यांतील ग्रामपंचायत निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले निवडणूक आयोगांने ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका कार्यक्रमांची घोषणा केली आहे. यामध्ये राज्यभरांतील ग्रामपंचायतीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार तर २० डिसेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आदेशानुसार १८ नोव्हेंबर रोजी निवडणुकीची नोटीस जारी होणार आहे त्यामुळे निकाल जाहीर होईपर्यंत ७७५१ गावामध्ये आचारसंहिता लागू राहील. राज्यांत आता लवकरच ग्रामपंचायतीची निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील निवडणुकीची रणधुमाळी पाहिलाय मिळणार ऑक्टोंबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीची तसेच हिंगोली जिल्ह्यांतील ६२ ग्रामपंचायतचा समावेश आहे. त्यामुळे राज्यांतील जवळपास एकुण ७७५१ ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. या ग्रामपंचायतीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होईल तर २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तर निवडणूक तिची नोटीस प्रसिद्ध करण्यांचा १८ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज २८ नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. अशी माहिती राज्य आयोग निवडणूक आयोगाकडूंन मिळाली.