
दैनिक चालू वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
उस्माननगर:- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेतील विद्यार्थीनींनी श्रुती प्रशांत कांबळे हीने शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२१-२०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.यामध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेतील विद्यार्थीनींनी श्रुती प्रशांत कांबळे हीने शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.श्रुती कांबळे हीचे आजी, आजोबा,आई, वडील, तसेच शाळेतील
मुख्याध्यापिका सौ.विद्या बळव़ंतराव वांगे , अनिरूद्ध सिरसाळकर,जी.जे.सोनकांबळे ,सौ. मंजुषा देशमुख , प्रल्हाद सुर्यवंशी , रामेश्वर पांडागळे ,सौ.मिनाक्षी लोलगे ,सौ.प्रेमला गाजुलवाड, यांच्या सह वर्ग मैत्रीणी यांनी अभिनंदन केले आहे.