
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- तालुक्यातील हाडोंग्री येथील सामाजिक कार्यकर्ते, दैनिक पुढारी चे तालुका प्रतिनिधी रविंद्र लोमटे यांची व्हाईस ऑफ मिडिया च्या उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या निवडीमुळे भूम-व्हाईस ऑफ मीडिया, सामाजिक राजकीय, सांस्कृतिक स्तरातून अभिनंदन चा वर्षाव होत आहे.व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारणी जाहीर करण्यात आली.निवडीचे पत्र जिल्हा अध्यक्ष हुंकार बनसोडे व कार्याध्यक्ष रहिम शेख यांनी दिले. यावेळी असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.