
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
निवडीनंतर विजयी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला.
भूम:- परांडा तालुक्यातील कुक्कडगांव येथील सरपंच शाहिस्ता सद्दाम शेख यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त
झालेल्या सरपंच व उपसरपंच पदासाठी शुक्रवारी (दि.११) निवडणूक घेण्यात आली. यावेळी निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निकिता गणेश वायसे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली परंतु उपसरपंच पदासाठी दोन अर्ज आल्याने निवडणूकीला रंगत आली.यामध्ये सरस्वती गुंडिबा कांबळे व अमृत बबन वायसे यांनी अर्ज भरला होता. यामध्ये सरस्वती कांबळे विजयी झाल्या. सदर निवडीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी योगेश जगताप यांनी पाहिले. यावेळी पोहेकॉ. गजानन मुळे, पोना संदिप चौघुले, पोलीस पाटील विनोद निरवणे, कोतवाल धनंजय औसरे, विलास गायकवाड आंबीकर, राजेंद्र वाघमारे, अमीर शेख, बालाजी पाटुळे, छगन लांडगे, गणेश वायसे आदीसह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. या निवडीनंतर विजयी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला.