
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
शासनाने एक नवीन ॲप नुकतेच महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट लॉन्च केलेले आहे. या ॲपद्वारे आपण घरबसल्या ग्रामपंचायतीचे सर्व दाखले मोबाईलद्वारे पाहू शकतोच याचबरोबर ग्रामीण भागातील प्रत्येक लहान मोठ्या नागरिकांचा जिव्हाळ्याचा संबंध आपल्या गावाच्या ग्रामपंचायतीसोबत नेहमीच येत असतो. शाळेत प्रवेश घेण्यासह पासपोर्ट, आधार काढण्यासाठी जन्मदाखला आवश्यक असतो. जमिनीची वारस नोंद, बँकातील मयत व्यक्तीच्या ठेवी वगैरे कामासाठी मृत्यू दाखला हवा असतो. विवाह नोंदणी उतारे, घराचे उतारे सुद्धा अनेक कामासाठी गरजेचे असतात. यासोबत शासनाच्या विविध योजना मिळवण्यासाठी सुद्धा ग्रामपंचायतीच्या दाखल्यांची आवश्यकता असते.
सध्याचा काळ ऑनलाईन झाला
असल्याने आता ग्रामपंचायती सुद्धा नागरिकांच्या सेवेसाठी ऑनलाईन झालेल्या आहेत. घरबसल्या सर्व दाखले मिळावेत. करांचा भरणा सुद्धा क्षणात व्हावा, विविध सेवा तातडीने मिळाव्यात यासाठी शासनाने नवीन मोबाईल अँप सुरु केले आहे. महा ई-ग्राम सिटीजन कनेक्ट असे त्याचे नाव असून प्ले स्टोअरवरून ते डाऊनलोड करता येईल. यामुळे ग्रामीण नागरिकांना घरबसल्या ग्रामपंचायतीच्या सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहे. मंठा तालुक्यातील 92 ग्रामपंचायती या अॅपसोबत जोडल्या गेल्या
असून नागरिकांनी या अॅपद्वारे सर्व सेवांचा फायदा घ्यावा, असे आवाहन मंठा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी.बी. थोरात यांनी केले आहे. ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या प्रॉपटींचा उतारा, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जन्म नोंद प्रमाणपत्र, मृत्यु नोंद प्रमाणपत्र कराचा भरणा या अॅपद्वारे करता येणार आहे. कोणत्याही दाखल्यांसाठी आता आपल्याला ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा लागणार नाही. प्ले स्टोअरवरून
MAHAEGRAM CITIZEN CONNECT
हे अॅप डाऊनलोड करून घेतल्यावर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, अधिकाऱ्यांची यादी सुद्धा पाहायला मिळणार आहे. प्ले स्टोअरमधून प घेतल्यावर 1. सर्वात खाली Don’t have account? Register यावर क्लीक करा. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होऊन तुमचे नांव, वडीलांचे नांव, आडनांव, लिंग, जन्म तारीख, मोबाईल नंबर, ईमेल टाकावा. त्यानंतर ओटीपीद्वारे खात्री करा. ही संपुर्ण
माहिती भरल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होईल. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर टेक्स्ट मेसेजद्वारे युझर आयडी पासवर्ड पाठवला जातो. याचा अॅप वापरण्यासाठी र उपयोग होतो. आपल्याला ग्रामपंचायतीला काही सूचना द्यायच्या असतील तर त्या नसुद्धा देण्याची व्यवस्था अॅपमध्ये आहे. 7 ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रातून 5 दिल्या जाणाऱ्या सुविधा ऍपवर उपलब्ध आहेत, अशी माहिती केहाळ वडगावचे ग्रामसेवक शुभम इंगळे व राहुल सूर्यवंशी रानमळाचे ग्रामसेवक यांनी दिली. या अॅपचा नागरिकांनी फायदा घ्यावा, असे आवाहन विस्ताराधिकारी पि. पि.तायडे यांनी केले.