
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विनम्र आवाहन करण्यात येते कि सोयाबीन कापूस कमी भावात विक्री करू नका, आपण शेतकरी ४ ते ५ खूप मेहनत करून सोयाबीन कापूस उत्पादन काढतो आपल्याला चार-पाच महिन्यात फायदा होत नाही तोच व्यापारी मंडळी ४ ते ५ दिवसात कमाई करून घेतात म्हणून आपला फायदा होत नाही कारण खरेदी करणाऱ्या लोकांना अर्थात व्यापाऱ्यांना होतो, खास बाब म्हणजे खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची एक गोष्ट लक्षात ठेवा किरकोळ व्यापाऱ्यापासून मध्यम मोठे व्यापारी आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी भाव वाढून देतात,परंतु दोन दिवस मार्केट बंद असल्यामुळे शनिवार रविवार भाव वाढल्याचा प्रचार प्रसार होतो,म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणावर आठवड्याच्या सुरुवातीला माल विक्री करण्यासाठी घेऊन येतात, त्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दिलेला भाव त्यापेक्षा कमी भाव देऊन शेतकऱ्यांचे नकळत फसवणूक केल्या जाते,म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा शुक्रवारी आठवड्याच्या शेवटी ज्या दिवशी भाव वाढून दिला जातो तोच भाव आठवड्याच्या सुरुवातीला भेटेल असे नाही ? आपल्या कष्टाचा व्यवहार थोडेतरी लक्ष ठेवून माल विक्री करा,कमी भावात विक्री करू नका, तसेच सध्याची परिस्थिती पाहता माल खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने विशिष्ट जागेवरती सगळ्या व्यापाऱ्यांनी खरेदी करावी म्हणून परवानगी अर्थात व्यवस्था केलेली असते,परंतु आज काल कोठे ही खरेदी करता येते का? अशा प्रकारची खरेदी होत असताना यांना परवानगी दिलेली आहे का या वरती कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक असल्यामुळे प्रशासकाच्या दुर्लक्षामुळे हे प्रकार घडत आहेत का? रस्त्यावर मालाची खरेदी होते त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून माल खरेदी करताना वजन काटे बरोबर आहेत वजन काट्यावर कोणाचे नियंत्रण आहे, त्या संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व व्यापाऱ्यांच्या काट्याची तपासणी केली पाहिजे, सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी माल विकायची घाई करू नये कारण घाई गडबडीमुळे घाटा होतो, घाट्याचा धंदा करू नका असे आपणास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनम्र आव्हान करण्यात येत आहे…