
दैनिक चालू वार्ता उस्माननगर प्रतिनिधी-लक्ष्मण कांबळे
उस्माननगर:- भारत जोडो अभियान अंतर्गत खासदार राहुल गांधी यांना पदयात्रेत कंधार तालुक्यातील काँग्रेस पक्ष बळकटीचा अहवाल सांगण्यात आला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष सक्षम पणे काबीज ठेवला असून प्रत्येक तालुक्यावर अशोक चव्हाण यांचे विशेष लक्ष आहे प्रत्येक कार्यकर्त्यांवर स्वतः लक्ष ठेवून राहतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाची बळकटी आहे कंधार तालुक्यात त्यांचे विशेष लक्ष आहे. अर्धापूर येथे भारत जोडा अंतर्गत चालत असताना खासदार राहुल गांधी यांना कंधार तालुका अध्यक्ष बालाजी माधवराव पांडागळे यांनी सांगितले काँग्रेस पक्ष बळकटीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विशेष लक्ष देत असतात. गोर गरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असतात नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात काॅग्रेस तालुका अध्यक्ष आपापल्या परिक्षेत्रामध्ये काँग्रेस पक्ष बळकटीसाठी तत्पर आहेत यापुढेही आम्ही सर्वजण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या आगामी काळात काँग्रेस पक्ष हा निश्चितपणे आघाडीवर नेऊ असा विश्वास खासदार राहुल गांधी यांना कंधार तालुकाध्यक्ष बालाजी माधवराव पांडागळे यांनी दिला मारताळा येथे त्यांचे बंधू माजी युवक काँग्रेस अध्यक्ष लोहा देवराव पांडागळे यांनी काकांडी येथे अशोक चव्हाण व बालाजी पांडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल दहा मिनिटे वेळ घेऊन खासदार राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला त्यात त्यांनी आताची शिक्षण, राजकीय व सामाजिक व्यवस्था व शिक्षणावरील पर्याय याबद्दल अडीअडचणी खासदार राहुल गांधी यांना सांगितल्या.