
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
परंडा(१४ नोव्हे ) – खासापूरी – करमाळा रोडवरील पालखी मार्गावरील “संतसेना महाराज चौक ” हा सन २००८ सालापासून लावलेला नामफलक अज्ञाताने पाडण्याचा प्रयत्न केला होता . दि. १३ नोव्हे रोजी नाभीक संघटना व वारकरी सांप्रदायांच्या वतीने तो नामफलक परत उभा करून त्याचे पुजन करण्यात आले .
वारकारी सांप्रदायातील महान संत व नाभीक समाजाचे आराध्य दैवत संत सेना महाराज यांनी समाजाला दिलेली शिकवण,उपदेश येणाऱ्या पिढीला व सर्वांना च आठवणीत राहावे या उद्देशाने संत एकनाथ महाराज पैठण यांच्या पालखी मार्गावरील या चौकास वारकरी संप्रदाय व नाभीक संघटनेच्या वतीने सन २००८ साली ” संत सेना महाराज चौक” असे नामकरण देण्यात आलेले आहे. तेव्हापासून आज पर्यंत दरवर्षी संतसेना महाराज पुण्यतिथी व संत एकनाथ महाराज पालखी दिवशी या नामफलकाचे पुजन मान्यवरांचे हस्ते करण्यात येते.या चौकाची ओळख “संत सेना महाराज चौक ” अशी च आहे. परंतू काही दिवसापूर्वी अज्ञाताने हा नामफलक पाडण्याचा प्रयत्न केला. यामुळे वारकरी संप्रदाय व नाभीक समाजाच्या भावना दुखविण्याचा प्रयत्न झाल्यामुळे,परत असा प्रकार झाल्यास नाभीक संघटना खपवून घेणार नाही.तालुका,जिल्हा व राज्य स्तरावर याची दखल घेतली जाईल असा ठराव यावेळी घेण्यात आला. दि. १३ नोव्हे .रोजी परंडा नाभीक संघटना व वारकरी संप्रदाया च्या वतीने या नामफलकाचे पुष्पहार घालून पुजन करण्यात आले.यावेळी नाभीक महामंडळाचे युवक जिल्हाध्यक्ष नागेश काशीद, संघटनेचे मार्गदर्शक किरण डाके, प्रकाश काशीद , नागेश यादव, विशाल काशीद, दिपक डाके, गणेश काशीद ,युवक तालुकाध्यक्ष प्रितम डाके, ओंकार , आकाश काशीद , स्वप्नील जाधव,आण्णा लोकरे , बंडू डाके, विक्रम शिंदे , दत्ता डाके कृष्णा काशीद,उदय काशीद, प्रभाकर वाघमारे गणेश चौधरी गणेश जमदाडे , अक्षय जमदाडे शेकडो समाज बांधव उपस्थित होते.