
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी
महाराष्ट्रात पदार्पण केलेल्या
भारत जोडो अभियान यात्रा डाॅ.सौ.मिनलताई पाटील खतगावकर यांच्या सुंदर संकल्पनेतून व बाळासाहेब पाटील खतगावकर यांच्या प्रेरणेतुन काॅग्रेस कार्यकर्तेच्या सहभागातुन नुकतेच झालेली भारत जोडो यात्रा कमालीची यशस्वी झाली. देशाचे युवा नेते मा.राहुल गांधी यांनी शंकर नगर मुक्कामी थांबले असता.सकाळच्या ध्वजारोहणाच्या वेळी श्री शिवशंकर माध्यमिक विद्यालयाचे कलाध्यापक,बालाजी पेटेकर यांनी राहुल गांधी यांचे काढलेले रांगोळीतील चित्र व स्लोगन पाहुन राहुल गांधी यांनी त्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
त्यांच्या या कलेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.