
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पुणे-संभाजी गोसावी.
पुणे जिल्ह्यांतील अवैध धंदे, गुन्हेगारीचा बीमोड करण्यास प्रधान्य दिले जाणार आहे त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगारीच्या जनजागृती सायबर दिंडी बरोबर वाहतूक कोंडी सोडविण्यांस माझा प्रयत्न राहील असे प्रतिपादन नूतन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले आहे. ते आज पोलीस मुख्यालयांत बोलत होते यावेळी पदभार स्वीकारल्यानंतर मी पहिल्याच आठवड्यांत अवैध धंद्यावर धडक कारवाईची मोहीम राबवली यात अवघ्या चार दिवसांमध्ये १३५ ठिकाणी कारवाई करुन ९ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यांत आला आहे. पोलीस अधीक्षकांच्या धडक कारवाईमुळे पुणे जिल्हा ग्रामीण हद्दीमधील अवैध धंदेवाल्यांचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहेत. यवत ,इंदापूर ,वालचंदनगर, नारायणगाव,आळेफाटा जेजुरीसह इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध जुगार आणि दारु अड्ड्यांवर छापे टाकले जिल्ह्यांतील गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्यासाठी आगामी काळात जोरदार प्रयत्न केले जाणार आहेत विशेषता: औद्योगिक पट्ट्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यावर भर असून व्यवसायिक आणि उद्योजकांना सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यांवर माझा भर राहील असेही गोयल म्हणाले… गुन्हेगारी टोळ्या अवैधरीत्या पिस्तूल बाळगणाऱ्या आरोपींची माहिती घेत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. तसेच आगामी काळात होऊ पाहणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांची माहिती गोळा करुन प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल असेही पोलीस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले (कोंडी सोडविण्यांस प्रधान्य वाहतूक कोंडीबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला) यावेळी अंकित गोयल पुढे म्हणाले पुणे जिल्ह्यांत महत्त्वांचे महामार्ग आहेत मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. वाहतूक कोंडीची समस्या आहे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांनी विविध वाहतूकविषयक उपाययोजना हाती घेतले आहेत.