
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
परभणी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी सेलू-जिंतूर विधानसभेचे भाजपा आमदार मेघना बोर्डीकर व गंगाखेड चे रामपाल आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे या आमदार द्वयीची नियुक्ती करण्यात आली आहे. परभणी जिल्हा पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.या जागांवर यापूर्वी महविकास आघाडीचे परभणी शिवसेनेचे डॉ. राहूल पाटील व जिंतूर येथील राष्ट्रवादीचे परिषद सदस्य बाबाजानी दुर्रानी यांची नियुक्ती करण्यात आली होती.
उर्वरित सदस्यांमध्ये राजकीय व खासगी सदस्य सुध्दा भरले जाणार आहेत. मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्ता विकासासाठी दुसऱ्या टप्प्याचे समितीवर सुध्दा वरील दोन्ही नमूद आमदारांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.