
दैनिक चालू वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
ऑटो रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समिती मराठवाडा कार्य अध्यक्ष
टायगर ऑटो रिक्षा संघटना चे जिल्हाध्यक्ष अहेमद (बाबा) यांनी माननीय श्री खासदार राहुल गांधी
यांच्यासोबत एक किलोमीटर पायी चालत प्रवास केला व ऑटो चालकांच्या समस्या सांगितल्या यावेळी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याची मागणी केली.
काँग्रेस चे लोकप्रिय खासदार मा.राहुल गांधी याच्या यांच्या सोबत दहा मिनिटे रिक्षा चालकांच्या हिता संबंधित चर्चा केली . कल्याणकारी मंडळ,महगाई,ओला
,उबेर सेवा बंद झाले पाहिजे,अॅटो रिक्षा चालकांना विधानसभा, विधानपरिषद मध्ये उमेदवारी दिली पाहिजेत ,विम्याचे हप्ते कमी केले पाहिजेत. महागाई मूळे वाढललेले गॅस, पेट्रोल,G . S. T . ,कमी झाले पाहिजेत व राहूल गांधी यांनी रिक्षाचालकांच्या विविध प्रश्नावर आस्ताविक पणे चर्चा केली यामध्ये कोणत्या कंपनीचे इंशुरन्स आहे.
युनायटेड,ओरीयनटेल,बजाज, रिलायन्स, लोंबार्ड,ह्या पैकी कोणत्या कंपनीचे इंशुरन्स आहेअसे विचारले. अहेमद बाबा व रिक्षाचालक राहूल गांधी सोबत जवाहरनगर पासून एक किलोमीटर पायी चालले यावेळी अहेमद बाबांना विचारले की, तुमच्याकडे कोणता मोबाईल आहे .व कोणत्या कंपनीचे सिम आहे त्यानी सांगितलेकी,माझ्याजवळ ओपोचा मोबाईल आहे व त्यामध्ये आयडीया चे सिम आहे असे अहेमद बाबानी उत्तर दिले यावर काही न बोलता स्मित हास्य केले व तुमचे प्रश्न सोडवीण्या साठी मी नक्कीच प्रयत्न करीन असे आश्वासन राहूल गांधी यांनी अॅटो चालकांना दिले. यावेळी नांदेड जिल्हा रिक्षा संघटनाचे अध्यक्ष, एम. ऐ .रहेमान, मारोती अस्वले,रिहान भाई, शहर अध्यक्ष मुखीद पठाण, शेख एहसान,मुसतकिम उर्फ गुंडूडू, नासेर खान, शेख जाकेर,मोहम्मद साबेर, आदी उपस्थित होते.