
दैनिक चालू वार्ता हातकणंगले प्रतिनीधी -कवि सरकार इंगळी,
ओतूर – संत गाडगे महाराज विचारमंच महाराष्ट्र राज्य
वतीने, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून, कवी गणेश पुंडे, कवयित्री योगिता पाखले ,बालिका बरगळ आणि योगिता कोठेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ,ऑनलाईन राज्यस्तरीय बालकविसंमेलनाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
संमेलनाध्यक्ष म्हणून पुण्याच्या प्रसिद्ध हायकुकार योगिता पाखले होत्या. आपले बालपणीचे खेळ हरवत चालले आहे.आधुनिक युगात मुलांना मोबाईल अगदी चिकटून बसला आहे.त्यासाठी आपल्या कृतीतून खेळाचे महत्व मुलांना पटवून दिले पाहिजे.कारण मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यांचा भविष्यकाळ घडवण्यासाठी आई वडिलांनी धडपडले पाहिजे.कारण उद्याचा येणारा काळ फार वेगळा असेल.असे मत आपल्या अध्यक्षीय मनोगतातून पाखले यांनी व्यक्त केले.
तर हिंगोलीच्या प्रसिद्ध कवयित्री बालिका बरगळ यांनी संमेलनाचे उदघाटन केले.आपण लहान असतांना कोणकोणते खेळ खेळायचो.त्याचा आनंद किती वेगळा होता.त्यासाठी जुने खेळ जिवंत ठेवणे तुमची आमची ,काळाची गरज आहे.त्यामुळेच मुलांचा सर्वांगीण विकास होईल.असे जुन्या खेळावर आधारित सुंदर रचना बालिका बरगळ यांनी सादर करून आपले मनोगत व्यक्त केले.
यामध्ये अंजली सामंत (मार्गदर्शक), राजेश साबळे(राज्याध्यक्ष) ,कविता काळे (राज्यसचिव) ,जेष्ठ साहित्यिका शुभा लोंढे ,आर.के.कांबळे ,समाधान गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तर पांडुरंग मुंजाळ वसमत,उषा ठाकूर नांदेड, सीमा भांदर्गे अमरावती,अनिल नाटेकर पुणे, ज्ञानेश पाखले पुणे,प्रेमा कुलकर्णी माजलगाव,नीरज आत्राम वरोरा चंद्रपूर, संध्या खरतळे यवतमाळ,दीपक तळवडेकर सिंधुदुर्ग, स्नेहल गाढवे पुणे, मनीषा खामकर पुणे, इत्यादी कवींनी दर्जेदार बालकविता सादर करून उपस्थितांना आनंदयोग प्राप्त करून दिला.
या बालकवीसंमेलनाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कांचन मून (संघटक) यांनी केले ,उपस्थितांचे आभार कविता काळे यांनी मानले.तर या सुंदर ऑनलाईन संमेलनाचे नियोजन,संयोजन रणजित पवार (संस्थापक कार्याध्यक्ष संत गाडगे महाराज विचारमंच महाराष्ट्र राज्य ) यांनी केले.