
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : परभणी येथील सावरकर प्रतिष्ठानच्या वतीने एक दिवसीय व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रसिद्ध लेखक, सिने अभिनेते शरद पोंक्षे यांचे शनिवार, ३ डिसेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ठिक ६.३० वाजता परभणीत एक दिवसीय व्याख्यान होणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान, परभणीच्या वतीने विद्यानगरी येथील
ज्ञानेश्वर माऊली मंदीरामध्ये “सावरकर विचार” या विषयावर शरद पोंक्षे यांचे एक दिवसीय व्याख्यान आयोजित केले आहे. अग्रेसर लेखक तथा सिने अभिनेते म्हणून गाजवलेल्या अदाकारी सर्वश्रुत असलेले शरद पोंक्षे यांचे मौलिक विचार ऐकण्यासाठी अधिकाधिक सावरकर प्रेमी आणि त्यांच्या विचारसरणीचे श्रोते आणि इतरांनी त्यांच्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावरकर समितीचे अध्यक्ष तथा त्यांचे सहकारी यांनी केले आहे.