दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:-जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा दादरकोपरा येथील प्राथमिक शिक्षक रामचंद्र मोकाशी यांना यंदाचा मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे राष्ट्रीय स्तरावरील शिक्षक प्रतिभा सन्मान २०२२ हा पुरस्कार मुंबई येथे कविवर्य अरुण म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला आहे.याच संस्थेने मागील वर्षी त्यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव पुरस्काराने सन २०२१ ने सन्मानित केले होते.त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक भरीव कामगिरीने यंदा त्यांना राष्ट्रीय स्तरावरील शिक्षक प्रतिभा सन्मान अवॉर्ड २०२२ साठी महाराष्ट्रातून नामांकन मिळाले होते.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन प्लॅनिंग अंड ऍडमिनिस्ट्रेशन (NIEPA) नवी दिल्ली यांचा शालेय नेतृत्व व व्यवस्थापन कोर्स यशस्वीरित्या पूर्ण प्रमाणपत्र प्राप्त,शाळा सिद्धि विभागीयस्तरीय प्रशिक्षण कोकण विभाग मुंबई,विविध तालुकास्तरीय व केंद्रस्तरीय प्रशिक्षणमध्ये प्रशिक्षक-मार्गदर्शक म्हणून काम,महादेव कोळी समाज उन्नती मंडळ महाराष्ट्र प्रदेश,माजी जिल्हा युवा सरचिटणीस म्हणून कामकाज,विविध सामाजिक प्रश्न सोडविणे तसेच आदिवासी संस्कृती संवर्धन व जव्हार संस्थान संवर्धन यासाठी विशेष प्रयत्न,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना जव्हार तालुका उपाध्यक्ष,शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यात सक्रिय सहभाग अशी त्यांची आजवरची ओळख आहे.
शाळेसाठी सीएसआर व सामाजिक संस्थामार्फत दरवर्षी आवश्यक प्रमाणात साहित्य व भौतिक सुविधा उपलब्ध करण्यात योगदान शिवाय तालुक्यातील नव्याने सुरू झालेल्या सारसुन व हातेरी शाळेतील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ बोरिवली मुंबई यांच्या सहकार्यातून मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यास सहभाग,कोविड योद्धा म्हणून एक्का फाउंडेशन ठाणे यांच्यातर्फे प्रशस्तीपत्र देण्यात आले होते.
मतदार नोंदणी केंद्रस्तरीय अधिकारी तसेच आदर्श BLO म्हणून प्रांताधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र,सद्यस्थितीत अगस्त फाउंडेशन कुप्पम (आंध्रप्रदेश) येथे होणारे गणित/विज्ञान राज्यस्तरीय प्रशिक्षणास पालघर जिल्ह्यातुन निवड यासारखे अनेक शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवविण्यात आले आहे.
