दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त देगलूर तालुक्यातील कोकलगाव येथील मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेतून घेण्यात आलेले कोकलगाव पाझर तलावाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याबद्दल या कामाची योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी म्हणून देगलूर उपविभागीय कार्यालयातील सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांना माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती तालुकाध्यक्ष महादेव उप्पे यांच्याकडून निवेदन देण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, कोकलगाव पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेतून या कामाची सुरुवात दि.१२ मे २०२२ ते दि. १८ जुलै २०२२ या कालावधीत पुर्ण करण्यात आले आहे. या कामाला लागणारे अंदाजित रक्कम रु. ४१.६१.२४७एवढे असून या कामात खुप मोठा भृष्टाचार झाल्याचे निदर्शनास आले असून सुद्धा जलसंवर्धन विभाग मात्र य कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत. या कामावरील गुत्तेदारांना संपर्क साधला असता त्यांनी ह्या कामाची अवधी संपल असून या कामावरील अभियंत्याला संपर्क करावा, माझा त्या कामात कसलाच संबंध नसल्याचे बोलत आहे. परंतू या कामावरील अभियंत्याला संपर्क साधला असता त्यांचा फोन लागत नाही.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती सौम्या शर्मा यांना निवेदन देताच श्रीमती सौम्या शर्मा यांनी योग्य मार्गदर्शन करीत या कामासाठी लागणारी अंदाजित रक्कम जलसंवर्धन विभागातून वर्ग केल्यामुळे त्यांनासुद्धा निवेदन देण्यात यावे व या निवेदनाची सखोल चौकशी करून दोषीवर योग्य कार्यवाही करण्यात येईल असे
आश्वासन दिले.
