
दैनिक चालू वार्ता औरंगाबाद ग्रामीण प्रतिनिधी-पंडोरे शितल रमेश
==========================
औरंगाबाद:- दि:- १/१२/२०२२ रोजी,कावलगाव ता .पूर्णा .जिल्हा परभणी सत्यशोधक मारोतराव नारायणराव पिसाळ हे दि:- ३० नोव्हेंबर २०१९ रोजी मृत्यु पावले पण त्यांनी समाज कल्याण साठी आपला देहदान करण्याचा निर्णय घेतला, आपल्या सर्वांना सोडून जगाचा निरोप घेतला . पण जाता जाता त्यांनी समाजाला १ आदर्श देऊन गेले ते म्हणतात ना की,मरावे परी कीर्ती रुपी उरावे.असाच किर्तीमान त्यांनी आपल्या पूर्ण आयुष्यात राखला. त्यांचे घोष वाक्य जय मानव असे होते आज दि:- १/१२/२०२२ रोजी संकलपूर्ती दिन निमित्ताने भव्य रक्त दान शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी शेळके वाडी येतील ग्रामपंचायत सरपंच अशोक माणिकराव शेकळे व जळबाजी बळीराम शेळके यांच्या हस्ते रक्तदान शिबिर संपन्न करण्यात आले तेव्हा गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या संकल्पनेत गावातील तरुण ही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले व अश्या रीतीने रक्तदान शिबिर संपन्न झाला