
दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक -ओंकार लव्हेकर
पनवेल जि.रायगड येथे राज्य कार्यकारिणी सभा
नांदेड — महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची बैठक प्रसाद पाटील राज्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. ०४डिसें.२०२२ ला राज्य कार्यकारिणी सभा व्ही. के.हायस्कूलचे कॉन्फरन्स हॉल, पनवेल जिल्हा रायगड येथे संपन्न होणार आहे. सभेला सर्व राज्य पदाधिकारी व जिल्हा प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सदर राज्य सभेमध्ये शिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या समस्याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच या प्रश्नांच्या पूर्ततेसाठी शासन प्रशासनाकडे संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात येणार आहे यावेळी राज्यातील सर्व जिल्ह्याचे संघटना प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती हरीश ससनकर राज्य सरचिटणीस, वसंत मोकल जिल्हाध्यक्ष रायगड, जी.एस.मंगनाळे राज्य उपाध्यक्ष यांनी दिली आहे.