
दैनिक चालू वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
उस्माननगर:- ज्येष्ठ साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद चे माजी कुलगुरू ,प्रसिद्ध समीक्षक डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांचे दिर्घ आजाराने निधन झाल्याचे समजताच उस्माननगर येथील वाचकांना धक्का बसला.
डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांनी कवितासंग्रह,कथा , कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या निधना बध्दल उस्माननगर येथील वाचक, शिक्षक, पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, उपाध्यक्ष माणिक भिसे, सचिव प्रदीप देशमुख, लक्ष्मण कांबळे,लक्ष्मण भिसे,पठाण अमजदखान, सुर्यकांत मालीपाटील, देविदास डांगे, विठ्ठल ताटे पाटील, संभाजी कांबळे, तसेच केंद्रप्रमुख जयवंतराव काळे, एकनाथ केंद्रे,शेख,सम्राट अशोक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे,मन्मथ केसे नितिन लाटकर, भगवान राक्षसमारे,गौतम सोनकांबळे, यांच्या सह अनेकांनी विविध ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली