
दैनिक चालू वार्ता उस्माननगर प्रतिनिधी-लक्ष्मण-कांबळे
उस्माननगर :- दिक्षा ॲप प्रयोगातून विज्ञान, तसेच विद्यार्थ्यांची स्तर निश्चितच करून गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी जे विद्यार्थी मागे असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून गुणवत्ता धारक करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम हाती घेऊन यशस्वीपणे शिक्षण द्यावे असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे यांनी केले.
जि.प.कें.प्रा.शा.उस्माननगर ता.कंधार येथील प्रांगणात सुंदर टेंन्ट टाकुन बिट स्तरीय सहावी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या शिक्षण परिषदेला केंद्रातील सहशिक्षकांनी उपस्थित राहून उस्फुर्त प्रतिसाद दर्शविला .या परिषदेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख मा.जयवंतराव काळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.ढोणे ,( कें.प्रा.शाळा चिखली,)श्री.बालाजी कनशेट्टे ( कें.प्रा.शाळा शिराढोण ) ,श्रीमती.विद्या वांगे , जी. गादेकर ,कांबळे , पवळे , हे होते . प्रास्ताविक श्री काळे यांनी केले .
त्यानंतर शिक्षण परिषदेला कंधार पं.स. चे गटशिक्षणाधिकारी मा.बालाजी शिंदे साहेब शिक्षणविस्तारअधिकारी मा.वसंत मेटकर साहेब यांनी भेट दिली , श्री. वसंत मेटकर ( शिक्षणविस्तार अधिकारी पं.स.कंधार) व पत्रकार संघाचे उपाध्यक्ष माणिक भिसे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून अभिष्टचिंतन सोहळा साजरा करून दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या, त्यानंतर गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे यांनी निपुण भारत अंतर्गत माता पालक मेळावा, तसेच ,दिक्षा ॲप, प्रयोगातुन विज्ञान , विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती करुन गुणवत्तेत मागे असलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता धारक करण्यासाठी ,विवीध उपक्रम घेऊन शिक्षण द्यावे असे आपल्या मार्गदर्शणातुन , शिक्षकांना सांगितले ,तसेच मेटकर साहेबांनी , उस्माननगर बिट हे शैक्षणिक कार्यात अग्रेसर आहे , सर्वच शाळा उपक्रमशील आहेत आणि यापुढे असेच गुणवत्ता पुर्ण विद्यार्थी घडवतील असे सांगितले व आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे त्यांनी आभार मानले , या शिक्षण परिषदेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव वर्षानिमित्त जिल्हा परिषद नांदेड द्वारा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले यामध्ये तालुकास्तरीय वकृत्व व निबंध स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत घवघवीत यश संपादित केलेल्या समता मा.विद्यालय उस्माननगर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यातुन पहिली आलेली कु. सानिका लोखंडे
तसेच निबंध स्पर्धेत कु.प्रियंका घोरबांड (द्वितिय) , कल्याणी विलास कौशल्य या मुलींनी स्पर्धेत बाजी मारल्या मुळे गटशिक्षणाधिकारी साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला , या परिषदेसाठी साधन व्यक्ती म्हणुन , बिट अंतर्गत येणाऱ्या शाळेतील सहशिक्षिक विश्वकर्मा , केंद्रे ई.एस. , शिंदे , धुळशेट्टे , वाघमारे , नितीन लाठकर ,पांचाळ , चन्नावार , मोरे ,यांनी आपले विषयाच सखोल मार्गदर्शन केलं , या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एकनाथ केंद्रे यांनी केले तर आभार श्री . गौतम सोनकांबळे यांनी मानले , या कार्यक्रमासाठी श्री खान , सुर्यवंशी ,सौ. सुशिला आलेवाड , सौ. सुनंदा पाटोदेकर,सौ. आशा डांगे , यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले .