
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-सर्वच जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक रणसंग्राम सुरू असून,दर्यापूर तालुक्यातील २५ ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.याकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याची अट असताना निवडणूक आयोगाने सर्व्हर डाऊन असल्याने आणि एकच दिवस बाकी असल्याने ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याची आता निवडणूक आयोगाने ऑफलाईन मुभा देण्यात आली असल्याचे दर्यापूर उपविभागीय मनोज लोणारकर यांनी सांगितले.त्याप्रसंगी तहसीलदार डॉक्टर योगेश देशमुख उपस्थित होते.दि.१८ डिसेंबर २०२२ रोजी ग्रामपंचायत निवडणूक करिता मतदान होणार आहे,तरी या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दि.२८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर असा चार दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे.सदर निवडणूक अर्ज सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाइन भरावा लागत असून त्याची ऑनलाईन प्रिंट निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा करावी लागते. सदर अर्जासाठी कालावधी ४ दिवसांचा देण्यात आला असून आता उमेदवाराकडे एकच दिवस शिल्लक असून सदर निवडणूक आयोगाने ऑनलाईन सर्व्हर डाऊन असल्याने उमेदवार सकाळी ५ वाजतापासून निवडणूक अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी सायबर कॅफे वर गर्दी करत आहेत.परंतु सर्व्हर पूर्णतः डाऊन असल्याने अर्ज भरण्यासाठी अडचण येत आहे.तरी सदर अर्जाचा कालावधी ५ दिवस आणखी वाढवून द्यावा किंवा अर्ज ऑफलाईन सादर करण्याची मुभा आयोगाने देण्यात आली आहे.