
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती :- अचलपूर शहरातील हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या कुस्ती निवड स्पर्धेत अंजनगाव सुर्जीचा होतकरू तरुण व खेळाडू आकाश गुजर हा जिल्हा केसरीचा मानकरी ठरला आहे.त्याने विजेतेपदाच्या लढतीत दर्यापूरच्या रोहित दुरातचा पराभव केला.दिनांक ३० नोव्हेंबर ला बुधवारी सायंकाळी ६ वाजता सुरू झालेली कुस्ती स्पर्धा रात्री ११:३० वाजता संपली.
कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अमरावती जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष विलास इंगोले,मार्गदर्शक जितेंद्रकुमार भिसे,राजपूत आदींची प्रमुख उपस्थिती होती.स्व.मोहनचंद गोखले यांच्या स्मरणार्थ प्रित्यर्थ परप्रितम गोखले,विनोद गोखले यांच्या परिवाराकडून २ किलो चांदीची गदा पुरस्कार म्हणून प्रदान करण्यात आली तर अक्षय बुंदेले यांच्या वतीने वयक्तिक गटातील १२ विजेत्या कुस्तीपटूंना पदके प्रदान करण्यात आली.नागपुरात झालेल्या या कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने पदकविजेते राजेश राजपूत,रणवीर सिंग रहाल,सुबोध भागडकर,नदीम खान,सुधीर देशमुख हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते.कुस्ती संघाचे माजी संचालक मोहनजी गोखले यांच्या स्मरणार्थ २ किलो चांदीची गदा विजेत्याला पुरस्कार म्हणून देण्यात आली.१२५,९७,९२,८६,७९,७४,७०,६५ आणि ५७ किलो वजनी गटातील कुस्तीपटूंनी निवड स्पर्धेत आपले कौशल्य दाखवले.अचलपूरचे एसडीपीओ अतुल नवगिरे,ठाणेदार अमोल बच्छाव,माजी पैलवान नगरसेवक बल्लू जवंजाळ,रिजवान पैलवान,संजय ताटे,नितीन आकुड,गजानन बिजागीरे,महावीर नंदवंशी,राम गौर सर इ.माननीय लोकांनी कुस्ती स्पर्धेचा आनंद लुटला.अचलपूर ह्या मल्लांच्या नगरीत प्रथमच जिल्हा कुस्ती निवड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून आतापर्यंत अनेक खेळाडूंना महाराष्ट्र केसरी विदर्भ केसरी पुरस्कार मिळाला आहे.
अचलपुरच्या मातीत प्रथमच जिल्हा कुस्तीचे आयोजन झाल्याने खेळाडूंना आनंद व्यक्त केला.ह्या कार्यक्रमाकरिता पवन बुंदेले,राजेश खोलापुरे,माणिक देशपांडे,अक्षय बुंदीले,राम बुंदेले, माजी कुस्तीपटू तथा प्रहार कार्यकर्ता बंटी ककरानिया,मनोज नंदवंशी,विनोद गोखले,राजेश बुंदेले यांनी अथक परिश्रम घेतले.अचलपूर कुस्तीगीर संघातील हनुमान आखाडा,भगतसिंग चौक,तांदूळ बाजार,अंबा देवी भवानीपेठ परतवाडा,हनुमान शाळा,अमिनाथ हनुमान आखाडा,जीवनपुरा गाझी आखाडा सोनुवाडा चौक आदींच्या संयुक्त विद्यमाने या जिल्हास्तरीय कुस्तीचे आयोजन करण्यात आले होते.