
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अचलपूर तहसीलच्या जल मध्यम प्रकल्पाचा पाठलाग अखेर संपला आहे.या प्रकल्पाच्या कामासाठी निधीची उपलब्धता न झाल्याने,गेल्या ५ वर्षांपासून रखडलेले कामे आता वेग घेतील अशी आता स्पष्ट शक्यता दिसत आहे.
वासनी मध्यम प्रकल्पाचे काम सन २००८ मध्ये सुरू करण्यात आले होते.परंतु गेल्या २४ वर्षात या प्रकल्पाचे काम पूर्ण होऊ शकले नाही.पर्यावरण मंजुरी व निधीअभावी हे काम रखडले होते.धरणाचे काम ६० टक्के आणि सांडव्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे तर कालव्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही.
दरम्यान अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चू कडू यांनी या प्रकल्पाबाबत शासनासमोर सातत्याने आवाज उठवून जलसंपदा विभाग प्रशासनाने पाठविलेल्या प्रस्तावाबाबत शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न केले.त्यामुळे शासनाने वासनी मध्यम प्रकल्पासाठी ८२६ कोटी खर्चाची मान्यता दिली आहे.त्यामुळे उर्वरित २२३ कोटी रुपयांच्या प्रकल्पाशी संबंधित कामांना आता गती मिळणार.प्रकल्पाच्या कामासाठी मिळालेल्या निधीमुळे प्रकल्पासह जिल्ह्यातील शेतकरी अचलपूर आणि चांदूरबाजार या दोन तालुक्यांचा समावेश झाल्याने आगामी अचलपूर मतदारसंघात बागायती खुप मोठ्या प्रमाणावर असून हा काळ्या मातीचा परिसर आहे आणि आता मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याने हा संपूर्ण परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे.याबद्दल लाभक्षेत्रातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे.