
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
———————————————
कुटुंबव्यवस्था निर्माण झाली आणि नात्यांची सुरुवात झाली.याशिवाय समाजात वावरत असताना मैत्रीचे नाते पण निर्माण झाले.काही नाती रक्ताची तर काही प्रेमाची निर्माण झाली.नवरा बायको आई वडील पिता पुत्र भाऊ बहिण मामा मामी काका काकू आजि आजोबा मेहुणा मेहुणी या कौतोंबिक नात्याशिवय मित्र मैत्रीण वर्गमित्र व्यवसाय मित्र पार्टनर गुरू शिष्य विज्ञार्थी शिक्षक संघटन सदस्यत्व अशी पण नाती निर्माण झाली.त्यानुसार व्यवहार होताना दिसतात.
नाती म्हंटले की आशा आणि विश्वास या दोन गोष्टी आल्या.या दोन गोष्टीवर च नात्यांची बांधिलकी अवलंबून असते.आश्या आणि विश्वास नात्यांचा प्राण आहे.श्वास आहे.दोन नात्यातील ह्या दोन गोष्टी नाहीश्या झाल्या की नाते निष्प्रभ होते.त्यातील ओलावा संपतो.जसे एखाद्या झाडाचा ओलावा संपला की ते वाळते तसे च नात्याचे होते.संवाद हा नाते टिकवण्यात दुआ असते.तो पण थांबतो. संवाद नसेल तर नाते दूर जातात किंवा विसरल्या जातात.म्हणून नेहमी रेंजमध्ये राहायला हवे.हल्ली माणसे फक्त काही प्रसंगाचे कारणे किंवा काही काम असेल तरच बोलतात अन्यथा नाही.कधी अधून मधून एकमेकास भेटत तर नाहीतच पण फोनवर सुधा संवाद साधत नाहीत.हल्ली माणसे फारच व्यवसायी झाली आहेत.त्यांना नात्या पेक्षा व्यवसाय महत्त्वाचा वाटतो.पैसा कमावण्यासाठी नाती विसरत आहेत.सर्व पैशाचे लोभी झालेत.नात्याचे लोभी नाहीत.भेटीगाठी व संवाद संपल्यामुळे नात्यांचा विसर पडत चाललाय.आपले क्लासमेट कोण कुठे आहेत काय करतात ते कोणत्या अवस्थेत जीवन जगतात याचा थांगपत्ता नाही.अनेकांना विसरलो.नावे सुद्धा आठवत नाहीत.असेच रक्ताच्या नात्याचे पण झालंय.हल्ली लहान व तरुणांना आपले काका काकू मामामामी ना पण ओळखत नाहीत.चुलत मावस भाऊ बहिणी माहीत नाहीत.पाहुणे तर कोण कुणाचे ? ते दूरच झाले.रक्ताच्या नात्याला काही मर्यादा असतात.ते जपून वापरावे लागते.पण धर्माचे व प्रेमाच्या नात्याला कोणत्याही मर्यादा नाही.म्हणून मित्र मैत्रिणी पुढे आपले मन मोकळे करता येते.दुःख बोलून दाखवतात येते.पण तेही संपताना दिसते आहे.कारण संवाद थांबला की सर्व थांबते.
पूर्वीची माणसे आर्थिक व्यवहार पेक्षा सामाजिक व्यवहाराला महत्त्व देत होते.इतर जाती सोबत पण बेटी व्यवहार नसला तरी रक्ताची नाते नसले तरी नाते जोडायचे.मामा काका पापू दादा अण्णा दाजी भाऊजी म्हणून एकमेकास बोलत असत.अजूनही ग्रामीण भागात काही गावात ही पद्धत आहे नात्याने बोलायची.ही परंपरा चांगली आहे.यामुळे जाती सलोखा असायचा.धर्म सलोखा असायचा.पण हल्ली नाते संबंधाने संवाद साधने बंद होत आहे.म्हणून जाती धर्म द्वेष वाढत आहे.खरे तर नाती जोडली की जाती जोडल्या जातात.आणि द्वेष नसला की धर्मा धर्मातील माणसे जोडल्या जातात.
धन संपती पैसा यांच्या सतत मागे लागल्याने अती स्वार्थ वाढल्या मुळे नाती दूर होताहेत.आजचा माणूस नात्याला महत्त्व देण्या ऐवजी पैशाला महत्त्व देत आहेत.सर्वांना पैसा प्यार झाला आहे.सुखलोलुप व चैनीचे जीवन जगू पाहतो आहे.यामुळे नाट्य पेक्षा पैसा महत्त्वाचा वाटतो आहे.म्हणून माणुसकी हे मूल्य विसरत चालले आहेत.विचार करून पाहिले तर नाते जपण्यात जो आनंद आणि सुख आहे ते पैशात नाही.हे आपल्या जुन्या माणसांना कळले होते.म्हणून ते गरिबीत असले तरी त्यांचे जीवन समाधानी व समृद्ध होते.साधी राहणी होती पण उच्च विचार सरणी होती.कारण ते नाती जोपासत होती.नाती जोपासण्यासाठी जे व्यवहार पद्धती रूढी परंपरा होत्या ते जोपासत होते.प्रत्येक जण आपला कामधंदा व्यवहार बाजूला ठेऊन सण वार लग्न सोयरिक मौत वास्तू शांती अश्या सुख दुःख प्रसंगी जात येत होते.यामुळे नात्यात ओलावा प्रेम माया आपुलकी असे.आजकाल एवढा दुरावा निर्माण झाला आहे की मुलं आई बापाचे आजारपणात तर नाहीच पण मौतीला पण येत नाहीत.एव्हढे पाष्यानहृदयी झाले आहेत.यांच्या पेक्षा जनावरे बरी म्हणायची वेळ आली आहे.
आज काल नाती संपत आली आहेत.आता तीच जिवंत आहेत ज्यात स्वार्थ साधणार आहे. पैसा अडका जमीन बंगला गाडी बँक बलेन्स असेल तिथे नाते आहे.हे जिथे नाही तिथे नाते नाही.आज जी नाते जोपासल्या जात आहेत ती केवळ धन संपती साठीच.आज त्यांच्याकडे वेळ आहे जर चार पैसे मिळणार असतील तर.हे झले नात्याचे.समाज गाव देश यांची बांधिलकी हे तर विसरलेच आहेत.त्यांना माहीत आहेत की माझ्या जडण घडणीत समाजाचे गावाचे देशाचे काय योगदान आहे तरी ते ऋण फेडणे ची प्रवृत्ती या आत्मकेंद्रित स्वार्थी लोकांची नाही.ज्यांच्याकडे सामाजिक राष्ट्रीय कार्येक्रम साठी वेळ नाही त्यांना हे माहीत नाही की त्यांच्या शिक्षणावर आरोग्यावर कर्जासाठी शासन किती पैसा खर्च करते ? तो पैसा तिजोरीतील म्हणजे जनतेनी दिलेला कर.अडण्यांचे जाऊ द्या पण शिकलेल्या ना हे कळायला नको का ,? कळते.तरी एवढा स्वार्थ की jo तो पैश्याच्या धुंदीत वेडा झाला य. म्हणूनच आजचे सारेच म्हणजे कौटोंबिक सामाजिक राजकीय धार्मिक वातावरण गढूळ झाले आहे.
ही परिस्थिती सुधारण्यासाठी आधी अमर्याद स्वार्थ लोभ सोडावा लागेल. कौटोंबी क सामाजिक कार्यक्रमांना महत्त्व द्यावे लागेल. वैयक्तिक मनोकामना ना सवयी ना आळा घालावा लागेल.नात्याचे महत्त्व व सामाजिक बांधिलकीचे महत्त्व समजून सांगण्याचे अभियान राबवले पाहिजे.गरजेसाठी नात्यांचा वापर न करता नात्यासाठी नाते जोपासण्याची आवश्यकता आहे.नात्यामध्ये स्वार्थ आड आणता कामा नये.नात ही एक पवित्र गोष्ट आहे.ज्यात आशा विश्वास प्रेम आपुलकी सौहार्द आहे.प्रत्येक माणसाला सुखी आनंदी जीवन जगण्यासाठी नात्याची गरज आहे.म्हणून नाती जोपासली पाहिजेत.मग ती रक्ताची असोत की मैत्रीची.राजकीय असोत की सामाजिक की धार्मिक की व्यावसायिक.त्यात ओलावा हवा.रुक्षता नको.नात्यात काही नाते नसेल तर ते कसले नाते ?शब्दांकन : दत्ता तुमवाड, संपर्क : ९४२०९१२२०९.