
दैनिक चालू वार्ता प्रतिनीधी -कवि सरकार इंगळी
हातकणंगले तालुक्यातून अनेक गावामधून हजारो नागरीक निवडणुकांसाठी अर्जर भरणेसाठी येत होते.महिलांची हि गर्दी लक्षणीय होती. परंतु अर्ज भरणेसाठी आत कार्यालयात जाणेसाठी मुख्म गेटला. कुलूप लावून एकच व्यक्ती जाऊ शकेल इतकीच जागा असलेने आत जाणेसाठी व बाहेर येणेसाठी झुंबड उडाली होती.त्यातूध काही वादावादीचे प्रकार घडत होते.तिथे असणारे पोलिस ही काही करू शकत नव्हते.
नागरीकांना विषेश करून महिलांना त्याचा त्रास होत होता.खऱ्या अर्थाने गर्दी लक्षात घेता प्रशासनाने निवडणूक अधिकारी यांनी एक जाणेचा आणि एक येणेचा मार्ग ठेवायला हवा होता.अशी नागरीकांची मागणी होती पण कुणीचं अधिकारी यांनी अक्ष दिले नाही.
आज अर्ज भरणेचा शेवटचा दिवस असलेने उमेदवाराची अर्जर भरणेसाठी झुंबड उडाली होती.पण गेटवरून एकच व्यक्तीचं आत बाहेर करण्यासाठी त्रास सहध करावा लागत होता.