
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- संपूर्ण भारतामध्ये नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम (NCAP) अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत अमरावती शहराने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.सन २०२२-२३ मधील Best Performing Cities या अंतर्गत सीपीसीबीने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारत सरकारच्या पर्यावरण वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयामार्फत तीन लाख ते दहा लाख लोकसंख्येच्या वर्गवारीत तिसन्या क्रमांकाचे पारितोषिक ( रक्कम रु २५ लक्ष) हे अमरावती महानगरपालिकेला जाहीर झाले आहे.
याबाबतचे पत्र भारत सरकारच्या पर्यावरण,वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाचे अप्पर सचिव नरेश पाल गंगवार यांचेकडून प्राप्त झाले आहे.अशा प्रकारचे बक्षीस मिळवणारी अमरावती महानगरपालिका ही महाराष्ट्रातील एकमेव आहे.अमरावती महानगरपालिका मार्फत नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत आत्तापर्यंत केलेल्या कामगिरीचा हा परिणाम असून या बक्षिसाचे वितरण ३ डिसेंबर रोजी केंद्रीय पर्यावरण,वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाचे मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते भुवनेश्वर येथे होणार आहे.या बक्षिसामुळे अमरावती महानगरपालिकेला भविष्यात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आणखी चांगले कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल,असा आशावाद मनपा आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर यांनी व्यक्त केला आहे.