
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी -दिपक काकरा.
जव्हार:-मनोरंजना सोबतच आदिवासी समाज बांधवांच्या समस्या मांडणाऱ्या ‘गैरी’ हा मराठी चित्रपट १६ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आदिवासी समाजाच्या समस्या दाखवणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आला.आदिवासी समाजाच्या वैद्यकीय समस्यांवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे मिनी पोस्टर दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनी नुकतेच जव्हार येथे प्रसारित केले.
आदिवासी समाजातील डॉक्टर होऊ पाहणाऱ्या युवकाची कथा या गैरी चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे.मुख्य अभिनेता असलेल्या मयुरेश पेम,प्रणव रावराणे आणि अभिनेत्री नम्रता गायकवाड यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे लेखन पांडुरंग जाधव यांनी केले आहे तर युक्ता प्रोडक्शन आणि द्विजराज फिल्म यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तसेच गुरु ठाकूर आणि विष्णू थोरे यांनी गीतलेखन तर अमित राज व मयुरेश केळकर यांचे संगीत दिग्दर्शन त्याचप्रमाणे फुलवा खामकर यांनी या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.
गैरी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन पांडुरंग जाधव तर मुख्य कलाकार अभिनेता मयुरेश पेम,अभिनेत्री नम्रता गायकवाड,प्रणव रावराणे,आनंद इंगळे,केतन पवार,समीर खांडेकर,सुनील देव,कृतिका गायकवाड आणि देविका दफ्तरदार यांनी या गैरी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.