
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी- समर्थ दादाराव लोखंडे
============================
लोहा-तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डेरला येथे आज शनिवारी बिनभिंतीच्या शाळेत मैदानावर विद्यार्थ्यांचे कथाकथन घेण्यात आले.यावेळी इयत्ता चौथीचा विद्यार्थी अध्यक्ष श्रीव्यंकटेश प्रशांत धुमाळे तर प्रमुख पाहुणे विष्णू श्रावण शिंदे हे होते .यावेळी कु.गायत्री गणेश शिंदे “उंदराला मांजर साक्ष”,कु.शरयू शंकर राजेगोरे”!भुकेला कावळा “,अनिकेत श्रीहरी पवार “कोल्हा आणि बगळा”,कु.आर्या आत्माराम राजेगोरे “बुडबुड घागरी”,कु.सेजल संतोष शिंदे “खरी मैत्री “,कु.गायत्री कामाजी कदम “हावरा ससा”,कु.धनश्री केरबा डुबुकवाड”लबाड लांडगा”,आनंदा बालाजी जाधव”टोपीवाला आणि माकडे “,कु.दुर्गा शंकर कदम “लोभी कुत्रा “,अर्णव अलधुत कदम “शर्यत”,विष्णू श्रावण शिंदे “चल रे भोपळ्या”,श्रीव्यंकटेश प्रशांत धुमाळे”लांडगा आला रे आला..”आदि.विद्यार्थ्यांसह शिक्षिका सौ.मनिषा पवार ,सौ.ज्योती हंबर्डे ,स्वयंपाकी आजी सौ.पद्मिनबाई धुमाळे यांनीही कथाकथन केले .मनोरंजक व अर्थपुर्ण विविध विषयावर कथाकथन करण्यात आले. जागतिक अपंग दिनानिमिताने दिव्यांग विद्यार्थी रुद्राक्ष कदम व गणेश शिंदे या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांनाही बोलतं करण्यात आले.विद्यार्थ्यांसाठीची तयारी व मार्गदर्शन वर्ग शिक्षिका सौ.अंजली भंडे यांनी केले .यावेळी राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक पंडित पवळे ,शिक्षक दत्तात्रय पांचाळ ,सौ.दिपाली सनपूरकर सह सर्व विद्यार्थी उपस्थित होते .