दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
————————————————–
अहमदपुर– ता.अहमदपूर जि लातूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मतिमंद विद्यालय व पांडुरंग मुकबधीर विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
दिव्यांग दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले.
सकाळी सात वाजता अहमदपूर शहरातील मुख्य रस्त्यावरून दिव्यांगाची प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली त्या नंतर अहमदपूर येथील न्यायालयाच्या माध्यमातून कायदेविषयक शिबीर घेण्यात आले.तदनंतर दिव्यागासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्य शिबीर घेऊन दिव्यांग विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
दिव्यांग दिनाचे औचित्य साधून पालक मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक देवेंद्र देवणीकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव गिरी, संस्थेचे सचिव विकास तपसाळे , श्रीनिवास तपसाळे ,बालाजी वाडीकर, मुख्याध्यापक दत्तात्रय बिरादार ,
शिरीष पाटील, अक्षृबा सुपे , ज्ञानोबा चिमले , काशिनाथ आगलावे यांच्या सह सर्व शिक्षक,दिव्यांग विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
