
दैनिक चालू वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांची भेट घेतली.बेलसरे यांनी नुकताच विभाग नियंत्रक अमरावती या पदाचा पदभार स्वीकारला आहे.यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र आंडे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी बेलसरे यांचे सदिच्छा भेट घेऊन स्वागत केले.सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची थकबाकी द्यावी,रजेचा पगार,भविष्य निर्वाह निधीची रक्कम लवकर द्यावी,सेवापुस्तकाची डुप्लिकेट प्रत द्यावी,अश्या सेवानिवृत्त कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
या सदिच्छा बैठकीत वेळी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घेऊ,असे विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी सांगितले.विभाग नियंत्रकांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
यावेळी अध्यक्ष राजेंद्र आंडे,कार्याध्यक्ष कोठारी,उपाध्यक्ष एम.पी.देशमुख,सुधाकर तिवने,फुके,रंगराव इसळ,जवंजाळ,शिवाजी देवके,पवनीकर,सुरेश सावळे,सुरेश केंडे,किटुकले,विजय कटके,उद्धवराव वानखेडे,येवतकर,गोविंद पाटील आदी उपस्थित होते. व संस्थेचे सदस्य उपस्थित होते.