
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडी चे अध्यक्ष डॉक्टर अनिल सांगळे यांचे महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष शितल नागरे चोले , कार्य अध्यक्ष सुरेखा सिरसाठ यांच्या संकल्पनेतून क्षत्रिय कुलवंशातील रेणुकामाता कुलदैवत व संत अवजीनाथ महाराज संत सद्गुरु वामनभाऊ महाराज व राष्ट्र संत भगवान बाबा दैवत असणाऱ्या व लोकनेता स्वर्गिय गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे राजकीय दैवत असलेल्या वंजारी समाजातील साहित्यिक यांचं संमेलन लोकनेते स्वर्गिय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती व समाज भुषण क्रांतिवीर शिक्षण सम्राट स्वर्गिय वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीच औचित्य साधून रविवार दि.25 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 च्या वेळेत एक दिवसीय राज्य स्तरीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करणयाच निश्चित झालं आहे या संमेलनासाठी संमेलन अध्यक्ष म्हणून प्रा वा ना आंधळे माजी उप प्राचार्य तथा ख्यातनाम साहित्यिक लाभले आहेत त्या अनुषंगाने सदर साहित्य संमेलन स्वागत अध्यक्षपदी समाज भुषण अकांऊट आणि ऑडिट व कर व्यवस्थापन क्षेत्रातील अग्रगण्य तसेच अनेक देश विदेशी कंपनीज मधे सदर क्षेत्रात विविध व्यवस्थापकीय पद भुषविलेले आणि गुजराती भाषा ज्ञात असलेले सिन्नर तालुक्यातील खंबाळा येथील भुमि पुत्र प्रशांतजी आंधळे यांची वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक गणेश खाडे , वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य चे राज्य सरचिटणीस उच्च विद्या विभुषित व्यक्तिमत्व सेवा निवृत्त भारत सरकारचे अधिकारी तथा वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य चे नेते डॉक्टर लक्षराज सानप यांच्या सुचनेनुसार वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य चे राज्य संपर्क प्रमुख खंडेश्वर मुंडे यांनी नियुक्ती पत्रा द्वारे निवड घोषित करून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या वंजारी समाजाच्या इतिहासात प्रथमच वंजारी समाज साहित्य संमेलन होत आहे आणि हे संमेलन द्राक्ष नगरी अशी ओळख असलेल्या नाशिक शहरात क्रांतीवीर वंसतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था येथे होणार असुन भव्य दिव्य अस संमेलन होईल आणि नाशिक च्या भुमि पुत्राला संमेलन अध्यक्षपदी निवड होऊन सन्मान मिळाला या बद्दल वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य च्या कार्यकारिणी चे व सर्व सन्माननीय पदाधिकारी यांचे संमेलन स्वागत अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रशांत आंधळे यांनी विश्वास व्यक्त केला आहे.आणि ईतिहास नोंद होईल असं संमलेन पार पडेल असा विश्वास व्यक्त केला . संमेलन स्वागत अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सिन्नर तालुक्यातील खंबाळा येथील ग्रामस्थ सह जिल्ह्यातील व राज्यातील अनेक मान्यवर आप्तेष्ट स्नेही सहकारी यांनी प्रशांत आंधळे यांचे अभिनंदन केले आहे . वंजारी समाज ईतिहास , खाद्य संस्कृती, समाजातील संतांचे कार्य ,समाज सद्यस्थिती, भविष्यातील आव्हाने व नियोजन, सामाजिक संस्कार, आदर्श समाज रचना सह विविध विषयांवर चर्चा यासाहठी समाजातील सर्व क्षेत्रातील मान्यवर यांना निमंत्रित करण्यात येईल . असं मत स्वागत अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्री प्रशांत आंधळे यांनी स्वागत अध्यक्ष म्हणून व्यक्त केले तसेच या निवडीबद्दल महाराष्ट्र गुजरात तसेच मध्यप्रदेशासह देश विदेशातील समाज बांधव यांनी प्रशांत जी आंधळे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या