
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा..तालुक्यातील35 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी तब्बल 157 तर सदस्यपदासाठी 632उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा दिवस होता. सर्वच तहसील कार्यालयात उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. संगणकातील सर्व्हरमधील तांत्रिक अडथळ्यांमुळे काही उमेदवारांनी ऑनलाइन तर काहींनी ऑफलाइन अर्ज दाखल केले. मागील 4 दिवसात सरपंच पदासाठी 56तर सदस्यासाठी 213अर्ज दाखल झालं होते.शुक्रवारी एका दिवसात सरपंचपदासाठी तर101 सदस्यपदासाठी 419 अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती मंठा तहसीलचे अव्वल कारकून प्रल्हाद दवणे यांनी दिली.
अनेक उमेदवारांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत वाजतगाजत गाड्याचा ताफा घेऊन
आपल्या समर्थकांसह गटागटाने येऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. शेवटच्या दिवशी वेळ वाढवण्यात आल्याने उमेदवारांची रात्री उशिरापर्यंत निवडणूक कार्यालयात गर्दी होती.दाखल अर्जाचाची छाननी 5 डिसेंबर रोजी होणार आहे.7डिसेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत माघारी घेता येणार आहेत. अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
बरबडा येथील सरपंचपदासाठी त्र्यिंबक नानासाहेब हजारें यांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला . याकडे सर्वांचे लक्ष वेधले.