
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार:-मौजे पेठवडज तालुका कंधार येथील नियमित चालणारा मटका , पत्त्याचे डाव व दत्त जयंती यात्रेत पट नावाच्या जुगारा मुळे गावचे विशेषतः तरुण पिढीचे खूप मोठे नुकसान होत आहे ह्या मटका, पटाच्या विळख्यात शाळकरी विद्यार्थी ही गुंतत आहेत परिणामी कित्येकांचे संसार उध्वस्त होत आहेत कित्येकानी कर्जबाजारी होऊन आत्महत्या देखील केले आहेत. ह्या अशा प्रकारच्या जुगाराना बळी पडून गावचे व परिसराचे खूप मोठे नुकसान होत असल्याने प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन असे जुगार कायमस्वरूपी बंद करावे व जुगार खेळवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावे . असे केल्यास
उद्ध्वस्त होणारे कुटुंब वाचतील, व देशाच भविष्य असणारा तरुण वर्गा यातून बाहेर पडले म्हणून प्रशासनाने लवकरात लवकर योग्यत्या कारवाया करून गावचा होनारा संभव्य धोका टाळावा. असे निवेदन सरपंच प्रतिनिधी दत्ता गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव जाधव, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन पांडुरंग कंधारे, सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र राजे, पत्रकार गजानन जाधव, यांनी पोलीस अधीक्षक नांदेड यांना दीले..