
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -वसंत आवटे
सेलू – राष्ट्र निष्ठा ज्याच्या विचारात भरली होती ज्यांनी लोकांच्या न्याय हक्कासाठी परी कष्ट केले अशा विश्वरत्न भारतरत्न क्रांतीसुर्य भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सेलू तालुक्यातील माळसापुर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना आणि त्यांच्या विचारांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी माळसापुर येथील माजी सरपंच गुलाबराव आवटे, नामदेव आवटे, अनिल आवटे, संजय आवटे, बाळू डंबाळे, तानाजी हरमुडे, ईश्वर हारमुडे, मदन आवटे, गोविंद आवटे, बन्सी भाऊ आवटे, सतीश जाधव, भास्कर आवटे, आबासाहेब आवटे आदी नागरिक उपस्थित होते.