
दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी-संघरक्षित गायकवाड
मुखेड महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय मुखेड समता पर्व आणि बा यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर संविधान दिन आणि ६डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनाच्या स्मृर्तीप्रित्यार्थ मोफत जातवैधता प्रमाणपत्र वितरणाच्या कार्यशाळेचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ एस बी अडकिने हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बी जी कांबळे प्र. वा जी एम, प्रा. बी यू गाजरे तर आभार प्रदर्शन प्रा डॉ संतोष शेंबाळे यांनी केले.
अध्यक्ष प्राचार्य डॉ एस बी अडकिने यांनी जात वैधता प्रकिया ही पालक व विद्यार्थी यांच्या अडचणी ओळखून राबविण्यात येणारा उपक्रम आहे.यामुळे वेळेची बचत कमी खर्चात आर्थिक लाभ मानसिक ताण कमी होतो असे सांगितले.
संबंधित कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व उपस्थित होते.