
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा तालुक्यात सम्यक विद्यार्थी आंदोलन तर्फे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.. यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष प्रा. आयु.आकाश साळवे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी माजी सरचिटणीस आयु आर्यन येलवे तसेच सर्व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
रा जि प शाळा तोंडसुरे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला या वेळी शिक्षक विद्यार्थी यांनी आप आपले मनोगत मांडले.
कला व वाणिज्य ज्यु कॉलेज मेंदडी
येथे युगपुरुष महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा
करण्यात आला या वेळी प्राचार्य श्री संदीप कांबळे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. डॉ आंबेडकराणाचे कार्य हे खूप महान असे होते त्यांच्या लिहलेल्या घटनेमुळे इथला समाज हा एक संघ आहे असे प्रतिपादन केले. प्रा. अंगद कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तर प्रा आकाश साळवी यांनी आभार व्यक्त केले कर्यक्रमास विद्यार्थी उपस्थित होते.