
दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी-संघरक्षित गायकवाड
मुखेड/ गेल्या अनेक दिवसापासून चालू असलेल्या चौकशी ग्रामपंचायत कार्यालय हंगरगा पक व दापका (गु) या दोन्ही गावातील चौकशी होऊन दोषीवर सरपंच व ग्रामसेवक अभियंता यावर कार्यवाही करण्यासाठी मनसे कडून वेळोवेळी पाठपुरावा करून जिल्हास्तरीय चौकशी लावली ती चौकशी करत असताना सी ई ओ मिसाळ पाणीपुरवठा यांनी गावात भेट दिली ह्या गोष्टीला दहा दिवस लोटले अजून तरी ती चौकशी होऊ नये म्हणून ग्रामसेवक जिल्हा संघटना
असहकार आंदोलन करून विरोध करून दबाव आणून चौकशी रोखण्याचा प्रयत्न केला पण आज मनसे जिल्हाध्यक्ष मोंटीसिंग जहागीरदार यांनी उपमुख्य कार्यकारी डॉ सुधीर ठोंबरे यांच्या केबिन मध्ये ठिय्या आंदोलन करून ग्रामपंचायत हंगरगा गावकरी तसेच कार्यकर्ते यांच्या मदतीने ३८ग्रामसेवक यांचे निलंबनाची कार्यवाही केली.
ह्या कार्यवाही नंतर मनसे पदाधिकारी यांची बैठक घेऊन पुढील कार्यवाही व चौकशी करण्याचे डॉ सुधीर ठोंबरे साहेबांनी आदेशित करून गावकऱ्यांचा आनंद द्विगुणित केला.
त्यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष माँटीसिंग जहागीरदार शहराध्यक्ष शफीक भाई शेख मनसे मुखेड तालुकाध्यक्ष संतोष बनसोडे,आत्माराम पताळे,आनंद दिंडे मा.उपसरपंच, प्रदीप पताळे उपसरपंच, रामेश्वर गायकवाड सदस्य,ओम पाटील, शिवाजी बर्दापूरे, खंडेराव पताळे, बालाजी पताळे आदी गावकरी उपस्थित होते.