
दैनिक चालु वार्ता वृतसेवा-
“हात दाखवा लालपरी बस थांबवा ह्या बिर्द वाक्याचे देगलूर आगार बस चालकांना पडतोय विसर”
——————————————————————
आदमपूर व अटकळी परीसरातील जेष्ठ नागरिक ज्यांचे वय वर्ष ७५ असलेल्या आशा नागरिकांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ लालपरी या बसने शासनाने मोफत प्रवास योजना सुरू केली आहे. परंतु आदमपूर फाटा येथे बहुतांश लालपरी बसेस थांबत नसल्याने अनेक जेष्ठ नागरिकांना आदमपूर फाटा येथेच अनेक तास ताटकळत बसावे लागत आहे.असे जर होत असेल तर भविष्यात शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. भास्कर भालेराव अटकळीकर, शिवसेना उध्दव ठाकरे गट रामतीर्थ सर्कल युवा सेना अधिकारी.
——————————————————————
——————————————————————–
बिलोली तालुक्यातील आदमपूर फाटा येथे लालपरी बसेस थांबवण्याचा दृष्टीने देगलूर आगारातील सर्व बस चालक यांच्या नावे तात्काळ सुचनेचे परिपत्रक काढुन प्रवाशांची होणारी गैरसोय तात्काळ थांबण्यात येईल . – अमर पाटील, आगार प्रमुख देगलूर .
——————-———————————————–
आदमपूर: बिलोली तालुक्यातील आदमपूर फाटा येथे देगलूर ते नांदेड जाणाऱ्या बहुतांश लालपरी बसेस हे थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असताना दिसुन येत आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील आदमपूर फाटा येथे आदमपूरसह परिसरातील मुतन्याळ, मिनकी, खतगाव, गळेगाव, थडीसावळी, गळेगाव, केसराळी, रामपूरथडी व हिप्परगाथडी आदी ठिकाणचे प्रवाशी आदमपूर फाटा येथून नांदेड जिल्हा कचेरी, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयात व तसेच परिसरातील बहुतांश विद्यार्थी हे शंकरनगर येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी व तसेच परिसरातील हजारो नागरिक हे नायगाव येथील असलेल्या मोठ्या बाजारपेठेत खरेदीसाठी व विक्रीसाठी दररोज आदमपूर फाटा येथून ये-जा करीत असतात. परंतु देगलूर आगरचे कांही लालपरी बसेस हे आदमपूर फाट्यावर थांबत नसल्याने विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी , सामाजिक कार्यकर्ते यांना बराच वेळ ताटकळत बसावे लागत आहे. त्या अनुषंगाने देगलूरचे आगार प्रमुख अमर पाटील यांनी संबंधित विषयाकडे लक्ष देऊन प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी अशी आदमपूर परिसरातील प्रवाशांतुन मागणी होत आहे.