
दैनिक चालू वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
उस्माननगर:- जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वस्तीगृह उस्माननगर ता.कंधार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेस वसतिगृहाचे कर्मचारी लक्ष्मण कांबळे यांनी दीपाने आणि धूपाने पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उस्माननगर येथील पोलीस पाटील विश्वंभर मोरे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष माणिक भिसे, व वस्तीगृहाचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालय उस्मानगर येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीमती गयाबाई घोरबांड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले यावेळी पोलीस पाटील विश्वंभर मोरे ,अशोक पाटील काळम, अमिनशहा फकीर, संजय( रुद्र) वारकड, अंगुलीमाल सोनसळे, शंकर काळे ,राहुल सोनसळे ,गंगाधर भिसे,गोविंद पोटजळे,संजय भिसे,परमेश्वर पोटजळे, सद्दाम पिंजारी ,ओंकार मोरे, माणिक भिसे, गणेश लोखंडे ,लक्ष्मण कांबळे आदी उपस्थित होते.
नागवंशी बुद्ध विहार उस्माननगर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर लहान मुलांनी त्रिशरण पंचशील ग्रहण करून अभिवादन केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा बौद्धाचार्य अंगुलीमाल सोनसळे, मुख्याध्यापक राहुल सोनसळे, पोलीस पाटील विश्वंभर मोरे, गंगाधर कांबळे ,सेवानिवृत्त पोलीस कांबळे साहेब ,रोहिदास कांबळे व बौद्ध महिला पुरुष व बालक उपस्थित होते.
उस्माननगर मराठी विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात पत्रकार संघाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जिल्हा परिषद माजी सदस्य प्रतिनिधी तथा महावितरणचे सेवानिवृत्त कर्मचारी माधव भिसे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी दत्ता पाटील घोरबांड ,आमिनशाह फकीर ,ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर काळे, अशोक काळम पाटील ,ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी गंगाधर भिसे गणेश लोखंडे ,अमजद पठाण ,माणिक भिसे, लक्ष्मण कांबळे आदी उपस्थित होते.
सम्राट अशोक प्राथमिक शाळा येथे राहुल सोनसळे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात येते यावेळी मुख्याध्यापक राहुल सोनसळे मनमथकेशे ,देविदास डांगे ,भगवान राक्षसमारे ,शकील शेख, नितीन लाटकर, समता मॅडम, मनीषा भालेराव (सोनसळे )आदी उपस्थित होते.
शिवाजी बहुजन जनहिताय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था उस्माननगर यांच्यावतीने भारतीय संविधानाचे शिल्पकार, प्रज्ञा सूर्य, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या लोकोपयोगी अभियान राबवून विद्यार्थ्यांना एक पेन एक वही हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना एक पेन एक वही भेट दिली यावेळी संस्थेचे संस्थापक गोविंद शेषराव भिसे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दत्ता घोरबांड ,गणेश लोखंडे ,लक्ष्मण कांबळे, नागण भिसे संस्थेचे उपाध्यक्ष संगीता विजय भिसे ,राम भिसे ,आदी उपस्थित होते एक वही एक पेन वाटपाचे सूत्रसंचालन सहशिक्षक दिगंबर भिसे यांनी केले व प्रस्तावना संस्थेचे कोषाध्यक्ष तेजस भिसे यांनी तर आभार प्रदर्शन नागन भिसे यांनी मानले.