
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी -समर्थ दादाराव लोखंडे
———————————————————
बीड: (दिनांक 08 डिसेंबर ) खाजगी विनाअनुदानित वरून अनुदानित शाळा किंवा तुकडीवर बदली करण्या बाबतची अधिसूचना आणि शासन निर्णयास स्थगिती देणारे परिपत्रक रद्द करावे अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव आणि सरचिटणीस राजकुमार कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की एखाद्या शैक्षणिक संस्थेत अनुदानित जागा रिकाम्या असतील तर त्या संस्थेत विनाअनुदानित तत्वावर काम करत असलेल्या शिक्षकांना अनुदानित जागेवर बदली करण्या बाबत शासन अधिसूचना 08/06/20 आणि शासन निर्णय 01/04/21 निर्गमीत करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात खाजगी विनाअनुदानित वरून अनुदानित शाळा किंवा तुकडीवर बदल्या करण्यात आलेल्या आहेत. अशा बदल्या न्यायोचित आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार आहेत. परंतु 01 डिसेंबर 2022 रोजीच्या शासन परिपत्रका नुसार अशा बदलण्यास स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या शैक्षणिक संस्थेत अनुदानित जागा रिक्त झाल्या तर त्याच संस्थेत विनाअनुदानित तत्वावर काम करत असलेल्या शिक्षका ऐवजी दुस-या शिक्षकाची नियुक्ती करणे विनावेतन काम करणा-या शिक्षकांवर अन्याय करणारे आहे. त्यामुळे शिक्षकांमधे तीव्र नाराजी आणि असंतोष निर्माण झाला आहे. याची दखल घेऊन विनाअनुदानावरून अनुदानावर बदलीवरील स्थगिती देणारे परिपत्रक रद्द करावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम, कोषाध्यक्ष ए.बी. औताडे,सहसचिव सौ.रेखा सोळूंके ,जिल्हाध्यक्ष व्यंकटराव चिलवरवार ,सचिव रविद्र वाकोडे ,के.का.सदस्य जी.पी.कौसल्ये ,ई.डी.पाटोदेकर ,जिल्हाकार्याध्यक्ष बी.डी.जाधव,कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील ,सहसचिव आर.पी.वाघमारे ,उपाध्यक्ष गणेश बडुरे,मठपती सर,महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.विजयालक्ष्मी स्वामी,शहराध्यक्ष डी.बी.नाईक ,सचिव टीमकीकर सर यांच्यासह जिल्यातील सर्व पदाधिका-यांनी केले आहे.