
दैनिक चालू वार्ता कल्याण / प्रतिनिधी-
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने विकास प्रबोधिनी समाजसेवा संस्था आणि आकांक्षा फोटो स्टुडिओ यांच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन म्हसोबा चौक, कल्याण पूर्व येथे करण्यात आले. विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन करून पुष्पहार आणि पुष्प अर्पण करून सुत्रपठन घेऊन अभिवादन करण्यात आले . यावेळी विकास प्रबोधिनी समाजसेवा संस्था आणि आकांक्षा फोटो स्टुडिओ यांच्या वतीने प्रमुख उपस्थिती कडोमनपाचे जे वॉर्ड ऑफिसर सविता हिले आणि इतर मान्यवरांच्या हस्ते अल्पउपोहार चहा व पोहे वाटप करण्यात आले. आकांक्षा फोटो स्टुडिओचे संचालक तथा कल्याण पूर्व शहर उपाध्यक्ष अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे अविनाश शिरकर आणि विकास प्रबोधनी संस्था अध्यक्ष मधुकर गंगावणे , संस्थेचे संस्थापक राजेश चौहान , महासचिव आशा रणखांबे, साहित्यिक आणि संस्थेचे मार्गदर्शक नवनाथ रणखांबे, खजिनदार भागवत गमरे, सदस्य नरेंद्र बालनाईक, महिला अध्यक्षा रेखा चाबुकस्वार, रेश्मा शिरकर, बिना पटवा, आरती शिरकर , रमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाना नेटावटे इ. उपस्थित होते.