
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ आंबेकर
ग्रामसेवक व सरपंच ग्रांमसभा, न घेता ठराव घेऊन पाणलोट व्यवस्थापना करून कंचेली येथील सरपंच श्री राम रेड्डी अध्यक्ष झाले सचिव शिवाजी रमेश राठोड यांना करून पाणलोट विकास निधी पाणलोट केलेल्या १,६४००० हजार रूपये उचल करून हडप केला गावातील बचत गटाने लोक वर्गणीतून पाणलोट क्षेत्रासाठी जमा केलेला निधी गावातील लोकांना कसले ही भन्नक न लागू मिळून जुन्या स्टॅम्प चा वापर करून पैसे उचल केल्याची तक्रार गावातील एका नागरिकाने माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्या न्यायालयात केली आहे,तक्रारदाराची अशी मागणी आहे की सरपंचाची निवड फेब्रुवारी २० २१ कमध्ये निवड झाली असून तेव्हापासून त्यांनी नियमानुसार एकही ग्रामसभा घेतली नाही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ०७ व ३६ नुसार सरपंच पदावर निवड झाल्यापासून आर्थिक वर्षात चार ग्राम सभा व बारा मासिक सभा घेणे बंधनकारक आहे परंतु सरपंचाने एकही ग्रामसभा व बारा मासिक सभा न घेतल्यामुळे ग्रामसेवक ही तितकाच दोषी असल्यामुळे त्यांना पदावरून बडतर्फ करावे व ग्रामसेवकांनाही निलंबित करावी अशी मागणी तक्रार दारानी केली आहे, तसेच श्रीराम रेडी राठोड यांची सरपंच पदावर निवड झाल्यापासून गावात अनेक समस्या निर्माण झाल्या असून सांडपाण्याच्या नाल्या व्यवस्थित नसल्यामुळे नाल्याचे पाणी रोडवर येऊन साचलेले आहे, सार्वजनिक ठिकाणी रोडवर लाईटची सुविधा नाही अशा अनेक समस्याने गाव त्रासले आहे,तेव्हा अशा सरपंचावर व ग्रामसेवकावर कारवाई करून बडतर्फ करावे अशी मागणी माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्या न्यायालयात केली आहे.