
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा माळटेकडी येथील श्रीकृष्ण ज्ञानमंदिर मंदिराच्या विकासासाठी नांदेड जिल्हा सहकारी बँकेचे संचालक युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वतीने ७ लक्ष रूपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे.
लोहा शहरात दि.८ डिसेंबर रोजी श्री दत्तात्रेय प्रभू अवतार दिन व पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व त्यांचें विसर्जन माळटेकडी येथील श्रीकृष्ण ज्ञानमंदिर मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नांदेड जिल्हा सहकारी बँकेचे संचालक युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर त्यांच्या अर्धांगिनी सौ.वैशालीताई प्रविण पाटील चिखलीकर ,लोहा न.पा
चे उपनगराध्यक्ष दता भाऊ वाले, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक केशवराव मुकदम, हळदवचे सरपंच प्रल्हाद पाटील वडजे, भाजपा युवा मोर्चाचे लोहा तालुकाध्यक्ष बंडू पाटील वडजे, नगरसेवक भास्कर पाटील पवार, माजी नगरसेवक अप्पाराव पाटील पवार, नामदेव पाटील पवार (काकाजी), दिपक पाटील कानवटे,सचिन मुकादम,कांता बिडवई, भानूदास पाटील पवार, भारत पाटील कदम,बाळा पाटील पवार, प्रवीण धुतमल, बाळा पाटील कदम, व्यंकट जंगले, संदीप पाटील जाधव,बंटी देशमाने,अक्षय पांचाळ, यांच्या सह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होता .
यावेळी नांदेड जिल्हा सहकारी बँकेचे संचालक युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांचा कौटुंबिक सत्कार हळदवचे सरपंच प्रल्हाद पाटील वडजे व भाजपा युवा मोर्चाचे लोहा तालुकाध्यक्ष बंडू पाटील वडजे यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच यावेळी महंत सातारकर बाबा यांचे प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला .