
दैनिक चालू वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
अनुदानित वसतिगृह अधिक्षक व अधिक्षेक्तर कर्मचारी व संस्थाचालक संघटनेच्या भव्य मेळाव्याचे आयोजन गुरुनानक विद्यामंदीर शिवनगर नांदेड येथे दि. १० डिसेंबर रोजी ठिक ११:०० वा. करण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी दिली आहे.मेळाव्याचे उद्घाटक खा. प्रताप पाटील चिखलीकर, अध्यक्षस्थानी सुशिलकुमार चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे मुख्य मार्गदर्शक अनिलराव कोल्हे उपस्थित राहणार आहेत.
सदर मेळाव्यास जिल्हयातील सर्व संचालक व वसतिगृहाचे कर्मचारी (अधिक्षक, स्वंयपाकी, मदतनीस, चौकीदार) यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघटेनेचे संस्थापक अध्यक्ष सतिश गोटमुखले, जिल्हाअध्यक्ष सुरेश जाधव, गंगाधर सिध्देवाड, साहेबराव गुंडेकर, नामदेव गजले, सुभाष कांबळे, गणेश ठोके, संतोष मुंडे, शिवाजी पवार, शिवाजी तेलंग, ज्ञानेश्वर तेलंग, काकासाहेब जोंधळे, दिगांबर डोके, विलास नेवळे, वंदना पाटील, शेळके मॅडम, अजिता वडजे, माणिक एंबडवार, सुभाष ढवळे, जनार्धन वाठोरे, गंगाराम धुर्वे, राजेश तुपकरी, चंद्रकांत केंद्रे, गजानन बेंबरकर, आनंद झाडे, आदिल पाटील, विलास वाघमारे, मनोज चव्हाण, बालाजी राठोड, आर. आर. गाडेकर, युवराज चव्हाण, अभिजित बोनगीरवार, किनाके यांनी केले आहे…