
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
संतोष राजगुरू यांची सावता परिषदेच्या प्रदेश मुख्य संघटक पदी फेर निवड करण्यात आली संतोष राजगुरू गेल्या अनेक वर्षापासून सावता परिषदेमध्ये काम करत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी फेरनिवड केली. सावता परिषदेची प्रदेश कार्यकारणीची मीटिंग बीड येथे दोन दिवस संपन्न झाली या मीटिंगमध्ये आगामी काळामध्ये महाराष्ट्रातून २७ जिल्ह्यातून जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते .
यावेळी सर्व जिल्हाध्यक्षांचा कामकाजाचा आढावा घेण्यात आला आणि आगामी काळामध्ये सावता परिषदेचे ध्येय धोरण तळागाळापर्यंत वाड्या वस्ती पर्यंत कल्याण आखाडे साहेबांचे विचार माळी समाजाचे असलेले अस्मितेचे प्रलंबित प्रश्न व ओबीसीच्या मागण्या याच्यावरती काम करण्याचं संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे साहेबांनी सर्व जिल्हाध्यक्षांना प्रदेश कार्यकारिणीला आपल्या मनोगत मध्ये सूचना केल्या इथून पुढे प्रत्येक जिल्हाध्यक्षांचा कामकाजाचा तीन-तीन महिन्याला आढावा घेण्यात येईल असेही जाहीर करण्यात आले.
कल्याण आखाडे यांनी आपल्या भाषणामध्ये बोलताना म्हणाले संघटनेचं सर्वात महत्त्वाचं प्रदेश मुख्य संघटन हे पद मी संतोष राजगुरू यांना देऊन त्यांची या पदावरती फेरनिवड मी आज जाहीर करत आहे. त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून माझ्या खांद्याला खांद्या लावून संघटना स्थापनेपासून वाढीसाठी केलेला प्रयत्न त्यांची तळमळ त्यांची कामकाज करण्याची पद्धत बघून मी आज त्यांची प्रदेश मुख्य संघटक म्हणून फेरनिवड करत आहे या प्रदेश कार्यकारणी मीटिंगमध्ये निरनिराळे ठराव करण्यात आले .
सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे साहेब लवकरच महाराष्ट्र मध्ये राज्याचा दौरा करणार आहेत. माळी समाजाच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत. ओबीसीच्या मागणीसाठी सावता परिषद आगामी काळामध्ये खूप मोठा लढा उभा करणार आहे. असे त्यांनी याप्रसंगी भाषणामध्ये जाहीर केलं आगामी काळामध्ये गाव तिथे वाड्यावर तिथं सावता परिषद स्थापन करणार असे संतोष राजगुरू म्हणाले संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे साहेबांनी माझ्यावरती टाकलेला विश्वास या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही व आगामी काळामध्ये अधिक जोमाने काम करून सावता परिषदेचे जाळे महाराष्ट्रामध्ये बांधणार असल्याचे प्रदेश मुख्य संघटक संतोष राजगुरू म्हणाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अमरसिंह राजे पंडित व आमदार संदीप भैया शिरसागर व बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते अमरसिंह राजे पंडित यांनी संघटने विषयी व कल्याण आखाडे साहेबांविषयी आपल्या भाषणांमध्ये खूप कौतुक केले .कल्याण आखाडे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माळी समाजाचा आखाडा निर्माण केलेला आहे आणि त्याचे कल्याण तेच करतील असे आपल्या भाषणामध्ये अमरसिंह राजे पंडित म्हणाले आणि लवकरच आपल्याला गोड बातमी मिळेल असेही गौरव उद् गार त्यांनी काढले यापुढे कल्याण आखाडे साहेबांना आपण पाठबळ देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले संतोष राजगुरू यांचा सत्कार इंदापूर तालुका सावता परिषदेच्या वतीने सावता परिषदेचे इंदापूर तालुका अध्यक्ष प्रकाश नेवसे यांनी केला. यावेळी उपस्थित युवक आघाडी तालुकाध्यक्ष अमर बोराटे ,तालुका उपाध्यक्ष विष्णू झगडे, तालुका संघटक सुहास बोराटे, सोशल मीडिया इंदापूर तालुका प्रमुख सचिन शिंदे, भोडणी शाखाध्यक्ष अजय गवळी सह इतर पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मीटिंगमध्ये अनेक ठराव पारित करण्यात आले यावेळी युवा उद्योजक प्रशांत नेवसे उपस्थित होते.
यावेळी संतोष राजगुरू यांचं अनेक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक दिग्गज मान्यवरांनी त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत.