
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा, वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी व्हावी, होणाऱ्या मतदानाचा टक्का वाढावा, कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदारांनी मतदान करावे यासाठी गेली १३ वर्ष झाली निमगाव केतकी येथील काम करत आहे.
निवडणूक आयोगाद्वारे वर्षातील एका महिन्यात मतदार नोंदणी करण्यात येते पण बऱ्याचदा लोकांनी याची माहिती नसते यावेळी रिगल फाउंडेशनच्या वतीने गावात लोकांना याची माहिती व्हावी यासाठी गावात बॅनर लावले जातात, लोकांना मसेज करून नोंदणीसाठी आवाहन करण्यात येते, सोशल मीडियाचा वापर करुन जास्तीत लोकांपर्यंत ही माहिती पोहचवली जाते त्यामुळे लोकांना मतदार म्हणून नोंदणी करताना अडचणी येत नाहीत.नवीन मतदार नोंदणी करणे, पत्ता,नाव आणि इतर बाबींमध्ये दुरुस्ती करणे, घरातील मयत लोकांची नाव वगळणे, नवीन ओळखपत्र मिळवणे यासाठी असणाऱ्या फॉर्मची माहिती करुन दिली अशावेळी फॉर्म भरताना अडचणी आल्यास मदत केली जाते. त्याच बरोबर प्रत्येक भाग क्रमांक असणाऱ्या मतदार नोंदणी अधिकारी(BLO) यांची माहिती करुन दिली जाते जेणे करुन भरलेला फॉर्म कोणाकडे जमा करायचा याची माहिती भेटावी.
दर ६ वर्षांनी होणाऱ्या पदवीधर निवडणूकीच्या वेळीसुद्धा पदवीधर मतदारसंघासाठी पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यात येते.
प्रत्येक निवडणूकचा प्रचार सुरू असताना लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये यासाठी गावात मतदार जनजागृती रॅली काढून स्वाक्षरी मोहीम राबवली जाते यावेळी मतदार मी कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करणारच अशी शपथ घेतात.
यावेळी बोलताना राजू भोंग यांनी सांगितले की गेल्या १२-१३ वर्षांत आम्ही रिगल फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास १२००-१३०० लोकांची नवीन मतदार म्हणून नोंदणी तर २०१४ आणि २०२० च्या पदवीधर मतदारसंघासाठी जवळपास २२५ पदवीधर मतदारांची नोंदणी केली आहे त्यामुळे दहा वर्षांपूर्वी गावाचे आठ-साडे आठ हजारांच्या आसपास असणारे मतदान आत्ता १०,८५१ इतकं झालं आहे त्याचबरोबर प्रत्येक निवडणूकीत गावात मतदानाचा टक्का वाढला आहे. २०१९ ला तालुक्यातील लोकसभा निवडणुकीसाठी इंदापूर विधानसभा मतदारसंघाची मतदानाची टक्केवारी ५८% असताना गावातील मतदानाची टक्केवारी ६७% तर विधानसभा मतदानाच्या वेळी मतदारसंघातील टक्केवारी ७४ % असताना गावातील मतदानाची टक्केवारी ७८% होती.
यांत गावातील दुबार आणि मयत लोकांची मतदार यादीतील नाव कमी झाल्यास मतदानाचा टक्का अजून ४ ते ५ टक्क्यांनी वाढू शकतो.
रिगल फाउंडेशन या कामात राजू भोंग, माणिक भोंग, अंबादास जगताप, मंगेश भोंग, राम अभंग, शिवा भोंग, परेश महाजन, वैभव भोंग, तानाजी जगताप, सुरज शेख यांचा सहभाग असतो.