
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा-संभाजी गोसावी
तालुक्यातील शेंद्रे गावचे सुपुत्र वीर जवान शुभम दिलीप पडवळ हे त्यांच्या मूळ गावी सातारा तालुक्यांतील शेंद्रे या ठिकाणी सुट्टी साठी आले होते. आपली सुट्टी संपून कर्तव्यावर जात असताना. मनमाड नजीक स्टेशनवरती त्यांचा रेल्वेतून तोल गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना सातारा जिल्ह्यांतील शेंद्रे गावात समजतात ग्रामस्थांचा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्यावर सातारा ता. शेंद्रे या मूळगावी शासकीय इतमामांत तालुक्यांतील व जिल्ह्यांतील जनसमुदायांच्या तसेच शेंद्रे परिसरातील ग्रामस्थ मित्रपरिवार आदींच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यांत आला. वीर जवान शुभम पडवळ यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी दाखल होताच सजवलेल्या ट्रॉलीतून शेंद्रे गावातून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यांत आली. यावेळी मित्रपरिवार व शेंद्रे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये भारत माता की जय, वंदे मातरम अमर रहे शुभम पडवळ अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. वीर जवान यांच्या अंत्यसंस्कारांप्रसंगी गावातील व सातारा तालुका जिल्ह्यांतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अंत्यदर्शन घेतले. यावेळी सैन्य दलातील लष्करी विभागाकडूंन त्यांना मानवंदना देण्यांत देऊन त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. वीर जवान शुभम पडवळ यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी सातारा जिल्ह्यांचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके साहेब व त्यांचे सर्व पोलीस कर्मचारी यांच्यासह होम डिवायएसपी सजन हुकांरे यांच्यासह शेंद्रे परिसरांतील ग्रामस्थ मित्रपरिवार तसेच शेंद्रे गावचे सरपंच, शेंद्रे गावाचे पोलीस पाटील उमेश यादव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. वीर जवान शुभम दिलीप पडवळ यांच्या पश्चांत आई वडील बहीण असा त्यांचा परिवार होता. शुभम पडवळ यांच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबीयांना चांगलाच धक्का बसला आहे. शुभम पडवळ हे घरातील कर्तबगार होते. व गावातील सर्वांशी ते मनमिळावू प्रेमळ असा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे त्यांच्या जाण्यांमुळे शेंद्रे परिसरांतून हळहळ व्यक्त होत आहे.