
दैनिक चालू वार्ता कौठा प्रतिनिधी – प्रभाकर पांडे
दरवर्षीप्रमाणे धानोरा (कौठा) गावात दत्तजयंतीनामित्त जत्रा भरते. जत्रेमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. कलामहोत्स्वात आपल्या महाराष्टाची जूनी ओळख असलेला नाच यांचा समावेश असतो. दत्तजयंतीच्या दिवशी दत्ताची पालखी निघते. दुसर्या दिवशी म्हणजे काल दि. 08/12/2022 रोजी जंगी कुस्त्याचा फड रंगला. फडाची सुरवात महंत चिंतनबन महाराज यांच्या हास्ते नारळ फोडुन झाला. सर्वात शेवटची कुस्ती 11000/- रुपयाची झाली. प्रथम बक्षीस पहलवान श्री. परमेश्वर पाटील जगताप बामणीकर यांनी तर दुसरे 7000/- बक्षीस पहलवान श्री. राम पाटील काळेनी जिंकले. कुस्ती व जत्रेच्या बंदोबस्तासाठी उस्मानगर पोलीस स्टेशनचे पिआय भारती साहेब हे स्वतः उपस्थित होते आणि त्यांनी दुसरे दोन पुलीस बंदोबस्तास पाठवले होते. हा सर्व महोत्सव उत्तमरित्या पार पाडण्यासाठी गावातील सरपंच प्रतिनिधी श्री. संजय बाबाराव हात्ते, उपसरपंच श्री. शिवराज पाटील जाधव, माधवराव मोहनराव माली पाटील, संतोष जाधव सर, उत्तम जाधव सर, निळकंठ हात्ते, वसंतराव कदम, रणजित जाधव, सुरेश गणेशराव पाटील, व्यंकटराव जाधव,मोहनराव पा. कदम, दौलतराव पा.गोरठे, कोंडीबा पा. गोरठे, शिवाजी तळणे, रावसाहेब पा.शेळगावे, मारोती पा.हाळदेकर,मारोती पा.गव्हाणे, मारोती नळे, आनंदा कौशल्ये, मारोती तेलंग, आण्णाराव पा.कदम, संजय सोनकांबळे, संदिप नवघरे, आनंदा नवघरे, गणपत सोनकांबळे,राहुल सोनकांबळे, बाबु सोनकांबळे, पांडु नवघरे व समस्त गावकरी मंडळीनी उत्सफुर्द प्रतिसाद दिला. सर्व महोत्सव उत्साहात पार पडला.