
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व काही संचालक सेवा सहकारी मतदारसंघ ग्रामपंचायत मतदार संघातून निवडून येऊन संचालक झालेले असताना 2021 पासून व काही 2022 मध्ये संबंधित मतदार संघातून संचालक व सदस्य पदाची मुदत संपल्याने त्यांचे संचालक पद संपुष्टात आल्याने त्यांचे संचालक पद रद्द करण्यात यावे व सभासद नसताना केलेल्या नियमबाह्य कामाचे ठराव रद्द करण्यात यावे व आर्थिक व्यवहाराबाबतीत त्यांच्याकडून झालेल्या गैरव्यवहाराची वसुली करावी व संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे माजी जि प सदस्य बालाजी बंडे यांनी सहकारी संस्था नांदेडची जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे एका निवेदनानुसार केली आहे याबाबतची माहिती त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दि६ रोज मंगळवारी केली
यावेळी माजी जी प सदस्य दशरथ राव लोहबंदे, उपजिल्हा प्रमुख भालचंद्र नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव तालुकाप्रमुख नागनाथ लोखंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील मुककावार उपस्थित होते
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व काही संचालक हे त्यांच्या मतदारसंघातून निवडून येऊन संचालक झाले त्या सदस्यांची सेवा सोसायती ग्राम पंचायत सदस्य हा पदावरील सदरील मतदारसंघातून ते निवडून आल्याने त्यांचे पद संपुष्टात आलेले असताना सुधा त्यांनी नियमबाह्य कामे केलेली आहेत ठराव घेतलेले आहेत तसेच संचालक मंडळास सहा महिन्याची राज्य शासन कडून मिळालेले मुदतवाढ नियमबाह्यरित्या मिळवून घेतलेली आहे मुळ पदवरील नियुक्ती च संपुष्टात आल्यानंतर त्यांची संचालक पदावरील मुदत वाढ पूर्णत अवैध नियमबाह्य आहे असा आरोप केला आहे
याबाबत उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ आधारे दाद मागविण्यात आलेली आहे संचालक पदाची मुदत संपल्यने मागील दिवसाचा कालावधी लोटेलेले असताना सुधा यातील संचालक ने जाणीवपूर्वक नियमबाह्य कामे करण्याचा सपाटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळांनी केला आहे याबाबत त्यांना राजकीय वरदहस्त मिळत असल्याचा आरोप आहे संच्कल कार्यकारी मंडळ ची मुदत दिनांक 25 11 2022 ला संपलेली असताना शासकीय प्रशासकाची नियुक्ती करण्यात चालढकल केली जात आहे शासकीय प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक मुखेड यांची नियुक्ती दिनांक 28 11 2022 रोजी जिल्हा उपनिबंधक डॉक्टर मुकेश बारहाते यांनी केलेली आहे मुखेड येथील सहाय्यक निबंध यांची नियुक्ती शासकीय प्रशासक म्हणून बाजार समिती मुखेड तेथे झालेली असताना त्यांनी सहा डिसेंबर २२ रोजी
पर्यंत पदभार घेतलं नव्हतं त्यांना राजकीय दाबव असल्याची शकतात आहे असा ही आरोप माजी जि प सदस्य बालाजी बंडे यांनी केले आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती खुशाल पाटील उमरदरी कर शिवराज पाटील लक्ष्मीबाई सखाराम वाघमारे यांच्याबाबत मुदत संपल्याची वरिष्ठाकडे तक्रारी केलेले असताना देखील या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात आहे ही संचालक मांडली हे पदावर नसताना देखील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात झालेल्या नियमबाह्य कामाची चौकशी करण्यात यावी अनीथा आगामी काळात औरंगाबाद उच्च न्यायालयाचे खंडपीठात या प्रकाराविरुद्ध दाद मागणार असल्याची माहिती माजी सदस्य बालाजी बंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.